मुंबई हायकोर्टाने मशिदीवरील लाऊड स्पिकरबाबत नुकताच मोठा निकाल दिला होता. मशिदींच्या भोंग्याविरोधात आवाजाची तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घेण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले होते. आवाजा विरोधात तक्रार आल्यास पहिल्यांदा समज द्या, नंतर दंड आकारा, पुन्हा आदेशाचे उल्लंघन केल्यास भोंगा जप्त करा, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिल्या होत्या. याच दरम्यान, भांडूप-मुलुंड लिंक रोडवरील मशिदींच्या आवाजांमुळे प्रदूषण होत असल्याचे समोर आले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली. याबाबत किरीट सोमय्या यांनी भांडूप पोलीस ठाण्यात आणि महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडे तक्रार दाखल केली आहे.
भाजपा नेते यांनी आपल्या तक्रारीची कॉपी ट्वीटरवर शेअर केली. भांडूप पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना लिहिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले. मुलुंड गोरेगाव लिंक रोडवरील काही रहिवाश्यांनी/नागरिकांनी रुणवाल ग्रीन रहिवाशी संकुलच्या मागे व भांडूप सोनापूर परिसरातील मस्जिद वरील जे लाऊडस्पीकर आहे ते ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन करित नाही अशी तक्रार माझ्याकडे केली आहे. याबाबत तपासणी करून माहिती द्यावी, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
श्रीलंकेत देशव्यापी वीज खंडितेला एक माकड जबाबदार!
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ उभारणार
यावर्षीचा भोपळा मागच्या भोपळ्यापेक्षा वेगळा
रणवीर आणि समय यांना मुंबई पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात सोमय्या म्हणाले, भांडूप-मुलुंड लिंक रोडवरील रुणवाल ग्रीनच्या मागे व सोनापूर येथील मशिदी वरील लाऊडस्पीकर / भोंगे खूप मोठ्याने वाजवले जातात. त्याचा आवाज खूप मोठा असतो. ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडली जाते अशी तक्रार आमच्याकडे आली आहे. यासंदर्भात भांडूप पोलीस स्टेशन येथेही आम्ही तक्रार नोंदवली आहे. यासाठी आवश्यक परवानगी घेतली जाते का?, त्याचे पालन केले जाते?. लाऊडस्पीकर / भोंग्याच्या आवाजाची मर्यादा किती असावी हे तपासावे व कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
दरम्यान, ध्वनी प्रदुषणाविरोधात तक्रार आल्यास ताकीद देणे बंधनकारक असल्याचे कोर्टाने म्हटले होते. तसेच तक्रारदाराचे नाव जाहीर न करण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या आदेशांतर्गत जर ध्वनीप्रदुषणाविरोधात तक्रार आल्यास तर पहिल्यांदा समज द्या, दुसऱ्यांदा तक्रार आल्यास रुपये ५,००० चा दंड लावा, पुन्हा तक्रार आल्यास भोंगा जप्त करण्यास सांगितले आहे.
मुलुंड-भांडुप गोरेगाव लिंक रोड, नाहूर, सोनापूर जंक्शन परिसरातील नागरिकांनी मशिदी वरील लाऊडस्पीकर/ भोंगे यांच्या ध्वनी प्रदूषण संदर्भात मला तक्रार दिली आहे.
मी भांडुप पोलीस स्टेशन व महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाला याची परवानगी व ध्वनी प्रदूषण संबंधी चौकशी कारवाई साठी विनंती केली pic.twitter.com/T4n45uxHvn
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 11, 2025