वांद्रे येथील जेष्ठ नागरिक महिलेच्या हत्येचा गुन्हयाची उकल करण्यात पोलिसांनी यश आले आहे.या हत्येप्रकरणी वांद्रे पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाला जवळून ओळखत होती, अशी माहिती पोलीस सूत्रानी दिली आहे. ही हत्या आर्थिक वाद आणि चोरीच्या इराद्याने झाली असल्याचा प्राथमिक तपासात समोर येत आहे.
शरीफ अली समशेर अली शेख (२७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शरीफ अली हा बळीत महिला राहत असलेल्या परिसरातच राहण्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वांद्रे पश्चिम रिक्लेमेशन आगार, एमआयजी कॉलनी येथील कांचन को.ऑप.हौसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय रेखा खोंडे या वयोवृद्ध महिलेचा सोमवारी रात्री उशिरा राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह वांद्रे पोलिसांना मिळून आला होता. मृत महिलेचे हातपाय बांधून तिच्यावर शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते.
तसेच घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला गेली होती, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली. वांद्रे पोलिसांनी बळीत महिला रेखा खोंडे यांची मुलगी हिच्या तक्रारीवरून हत्या आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करून मृतदेह प्राथमिक तपासणीसाठी भाभा रुग्णालय येथे पाठविण्यात आला होता. या घटनेमुळे एकट्या दुकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊन परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते.
हे ही वाचा:
युट्यूबने रणवीर अलाहबादियाचा ‘आक्षेपार्ह’ व्हिडिओ काढून टाकला
तानाजी सावंत यांचा मुलगा म्हणून गेला बँकॉकला, मोठ्या मुलाने सांगितली कहाणी!
जपानची कार्य संस्कृती सर्वोत्तम
महाकुंभात ४५ कोटी भाविकांनी केले पवित्र स्नान
बळीत महिला रेखा खोंडे यांची मुलगी ही मालाड येथे काही आठवड्यापूर्वी राहण्यास गेली होती. काही दिवसांपासून आई फोन उचलत नसल्यामुळे मुलगी सोमवारी रात्री आईला भेटायला आली असता हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान मुलीने त्याच परिसरात राहणाऱ्या शरीफ अली समशेर अली शेख (२७) यांच्यावर संशय व्यक्त केला असता पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी शरीफ याला अटक केली आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार मृत महिला शरीफला ओळखत होती, त्याचे तिच्याकडे ये जा होती, मृत महिलेने त्याच्यासोबत आर्थिक व्यवहार केला होता, त्याच वादातून तसेच चोरीच्या उद्देशातुन शरीफने हे कृत्य केल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.