कॉमेडियन समय रैना याने सादर केलेल्या ‘इंडियाज गॉट लॅटेंट’च्या भागात डिजिटल कंटेंट क्रिएटर रणवीर अलाहबादिया उर्फ बीअर बायसेप्स याने एका स्पर्धकाला अश्लील आणि अनैतिक प्रश्न विचारल्याने खळबळ उडाली होती. याचा व्हिडीओ व्हायरल होताचं सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. यानंतर केंद्र सरकारच्याच्या सूचनेनंतर, युट्युबने कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ शोमधील वादग्रस्त भाग काढून टाकला आहे. रणवीर अलाहबादिया याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे यावरून त्याच्यावर प्रचंड टीका झाली आणि तक्रारीही करण्यात आल्या.
मंगळवारी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी ट्विट केले आहे की, “भारत सरकारच्या आदेशानंतर रणवीर अलाहबादिया याच्या अश्लील आणि विकृत टिप्पण्यांसह युट्युबवरील ‘इंडियाज गॉट लॅटेंट’चा एपिसोड ब्लॉक करण्यात आला आहे.” त्यांनी यासंदर्भात स्क्रीनचा फोटो पोस्ट केला असून त्यात लिहिले आहे की, व्हिडिओ उपलब्ध नाही. सरकारकडून कायदेशीर तक्रारीमुळे ही सामग्री देशाच्या डोमेनवर उपलब्ध नाही.
रणवीर अलाहबादिया याच्या स्वतःच्या युट्युब चॅनेलला १ कोटी ५ लाख सबस्क्राइबर्स आणि इंस्टाग्रामवर ४५ लाख फॉलोअर्स आहेत. दिग्गजांच्या मुलाखती त्याच्या चॅनेलवर घेतल्या जातात. दरम्यान, रणवीर याला ‘इंडियाज गॉट लॅटेंट’च्या एका भागात बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी त्याने एका स्पर्धकाला पालकांच्या बाबतीत आक्षेपार्ह प्रश्न विचारले. यावरून वाद निर्माण झाला आणि तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर रणवीर याने माफी मागत म्हटले की, त्याची टिप्पणी केवळ अनुचित नव्हती, ती मजेदारही नव्हती. विनोद हा माझा गुण नाही. मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे.
हे ही वाचा :
मुंबई हल्ल्यासारख्या पाकिस्तानने दिलेल्या जखमा विसरता येणार नाहीत
इंडी आघाडीला ठेंगा; २०२६ च्या निवडणुकीसाठी ममतांचा एकला चलोचा नारा
ट्रम्प यांचा हमासला अल्टिमेटम; शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व ओलिसांना सोडा अन्यथा…
पराभव खोटं बोलण्यानं होतो, ईव्हीएममुळं नाही !
दरम्यान, मंगळवारी मुंबई पोलिसांनी अलाहबादिया आणि रैना यांच्याशी संपर्क साधून त्यांना चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास आणि वादाच्या सुरू असलेल्या चौकशीत सहकार्य करण्यास सांगितले आहे. तर, सोशल मीडियावर या वादाला तोंड फुटले असून या शोच्या एकूण कंटेंटबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे, ज्यामध्ये वर्णद्वेषी टिप्पणी, लैंगिक विनोद आणि वस्तुनिष्ठता यांचा समावेश असल्याचा आरोप आहे. काही वापरकर्त्यांनी समय आणि रणवीरच्या अटकेची मागणीही केली. रणवीर त्याच्या अध्यात्मासाठी ओळखला जातो आणि तो अनेकदा त्याच्या पॉडकास्टवर त्याच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल माहिती शेअर करतो. रणवीरला मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कारही मिळाला होता.