‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सूत्रसंचालक असलेले डिजिटल कंटेंट निर्माते रणवीर अलाहबादिया आणि समय रैना यांची मुंबई पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू आहे. मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी दोघांनाही समन्स पाठवले आहेत. पोलिसांचे एक पथक अंधेरी पश्चिम येथील सेव्हन बंगलोज जवळील बे व्ह्यू बिल्डिंग येथील रणवीर अलाहबादिया यांच्या निवासस्थानी पोहोचले असून तेथे रणवीर अलाहबादिया आणि समय रैनाची चौकशी केली जाणार आहे.
पोलिसांकडून वादग्रस्त व्हिडिओ क्लिप संदर्भात चौकशी करण्यात येत आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शो मध्ये, रणवीर अलाहबादिया याने एक अश्लील टिप्पणी केली. यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत असून कारवाईची मागणी केली जात आहे. या टिप्पणीवर राजकीय, सामाजिक, कायदेशीर आणि महिला हक्क संघटनांसह विविध व्यासपीठांवरून टीका झाली. अखेर मंगळवारी सकाळी मुंबई पोलिसांचे एक पथक वर्सोवा परिसरातील रणवीर अलाहबादियाच्या घरी पोहोचले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्याच्या सूचनेनंतर, युट्युबने कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ शोमधील वादग्रस्त भाग काढून टाकला आहे. रणवीर अलाहबादिया याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे यावरून त्याच्यावर प्रचंड टीका झाली आणि तक्रारीही करण्यात आल्या.
हे ही वाचा :
मुंबई हल्ल्यासारख्या पाकिस्तानने दिलेल्या जखमा विसरता येणार नाहीत
इंडी आघाडीला ठेंगा; २०२६ च्या निवडणुकीसाठी ममतांचा एकला चलोचा नारा
ट्रम्प यांचा हमासला अल्टिमेटम; शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व ओलिसांना सोडा अन्यथा…
पराभव खोटं बोलण्यानं होतो, ईव्हीएममुळं नाही !
रणवीर याला ‘इंडियाज गॉट लॅटेंट’च्या एका भागात बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी त्याने एका स्पर्धकाला पालकांच्या बाबतीत आक्षेपार्ह प्रश्न विचारले. यावरून वाद निर्माण झाला आणि तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर रणवीर याने माफी मागत म्हटले की, त्याची टिप्पणी केवळ अनुचित नव्हती, ती मजेदारही नव्हती. विनोद हा माझा गुण नाही. मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे.