29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषरा.स्व.संघाकडून बंगाल हिंसाचाराचा तीव्र निषेध

रा.स्व.संघाकडून बंगाल हिंसाचाराचा तीव्र निषेध

Google News Follow

Related

जगातील सगळ्यात मोठी सांस्कृतिक संघटना असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बंगालमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराची कठोर शब्दात निंदा केली आहे. तसेच केंद्र सरकारने पुढाकार घेत बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलवीत अशी अपेक्षा रा.स्व.संघाने व्यक्त केली आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी प्रसिद्धीपत्रक काढत बंगाल हिंसाचार प्रकरणाबद्दलची संघाची भूमिका स्पष्ट केली आहे.

काय आहे संघाची भूमिका?
“निवडणुका लोकशाहीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. पश्चिम बंगालची निवडणूक नुकतीच पूर्ण झाली. बंगालच्या संपूर्ण समाजाने यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. स्वाभाविकपणे निवडणुकांमधील विरोध आणि आरोप-प्रत्यारोप यात कधीकधी भावनांच्या मर्यादेचे उल्लंघन होते. परंतू आपल्याला नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की सर्व पक्ष आपल्या देशातले पक्ष आहेत आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घेणारे उमेदवार, समर्थक, मतदार हे सर्व आपल्याच देशाचे नागरिक आहेत.

निवडणुकीच्या निकालांनंतर लगेचच उसळलेला अनियंत्रित राज्यव्यापी हिंसाचार केवळ निंदनीयच नाही तर पूर्वनियोजित देखील आहे. समाजकंटकांनी महिलांसोबत घृणास्पद कृत्ये केली, निर्दोष लोकांची क्रूर हत्या केली, घरे जाळली, व्यापारी संस्था व दुकाने लुटली. हिंसाचाराच्या परिणामी एससी / एसटी समाजातील हजारो लोक बेघर झाले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास त्यांना भाग पाडले गेले आहे. कूच-बिहारपासून सुंदरबनपर्यंत लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे ही वाचा:

१०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत कळकळ पाहून कंठ दाटून आला

मराठा आरक्षणासाठी नाही, बार मालकांसाठी पवारांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबईतल्या निवासी डॉक्टर्सची महापालिकेकडून लूट?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या भीषण हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो. संघाच्या मते निवडणुकीच्या निकालानंतर होणारा अनियंत्रित हिंसाचार हा भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या लोकांच्या आणि लोकशाहीच्या मूलभूत भावना तसेच प्रत्येकाच्या मताचा आदर करण्याच्या भारतीय परंपरेच्या विरुद्ध आहे.

या निर्घृण हिंसेची सर्वात दुःखदायक बाब म्हणजे शासन आणि प्रशासनाची भूमिका केवळ मूक दर्शकाचीच राहिलेली दिसते. दंगलखोरांना कसलीच भीती राहिलेली दिसत नाही तसेच शासन प्रशासनाकडून कोणतीही ठोस पाऊले उचलली गेल्याचेही दिसत नाही.

सरकार कोणाचेही असो, कोणत्याही पक्षाचे असो, त्याची पहिली जबाबदारी म्हणजे कायदा व सुव्यवस्थेद्वारे समाजात शांतता व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणे, गुन्हेगार, असामाजिक घटक आणि हिंसक कारवाया करणाऱ्यांच्या मनात प्रशासनाची भीती निर्माण करणे आणि हिंसक गोष्टी करणाऱ्यांना शिक्षा सुनिश्चित करणे ही आहे. पक्ष निवडणुका जिंकतात, परंतु निवडलेले सरकार संपूर्ण समाजाला जबाबदार असते. आम्ही नवनियुक्त सरकारला आग्रह करतो की राज्यातील सुरू असलेल्या हिंसाचाराचा अंत आणि कायद्याचा नियम स्थापित करणे, दोषींना उशीर न करता अटक करणे आणि कठोर कारवाईची खात्री करणे ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असावी. तसेच हिंसाचारातील पीडितांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करून त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत. आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व पाऊले त्यांनी उचलावीत आणि राज्य सरकारही याच दिशेने योग्य ती कारवाई करेल हे केंद्राने सुनिश्चित करावे.

या संकटाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातील सर्व प्रबुद्ध नागरिकांना, सामाजिक-धार्मिक-राजकीय नेतृत्व करणाऱ्यांना असे आवाहन करतो कि त्यांनी पीडित कुटुंबांसमवेत उभे राहून विश्वासाचे वातावरण निर्माण करावे. तसेच कठोर शब्दांत केलेल्या हिंसाचाराची निंदा करावी. समाजात शांतता आणि बंधुतेचे वातावरण निर्माण करण्यात आपली महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा