25 C
Mumbai
Monday, July 22, 2024
घरविशेषदिल्लीतील विमानतळाच्या टर्मिनल- १ चे छत कोसळून एकाचा मृत्यू

दिल्लीतील विमानतळाच्या टर्मिनल- १ चे छत कोसळून एकाचा मृत्यू

गाड्यांचे झाले नुकसान; सहा जण जखमी

Google News Follow

Related

देशाच्या राजधानीचे शहर असलेल्या दिल्लीत मोठा अपघात झाला आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल- १ चे छत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी बचावकार्य सुरू केले. पहाटे ५:३० च्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले. एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, विमानतळाचे छत कोसळल्याने अनेक वाहने त्याखाली दबली गेली आहेत.

उष्णतेची भीषण लाट पसरलेल्या दिल्लीत नुकतीच पावसाळा सुरुवात झाली आहे. अशातच आलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी पहाटे काही भागांमधील रस्ते जलमय झाले आहेत. तर, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल- १ चे छत कोसळले. या घटनेत अनेक वाहनांचे नुकसानही झाले आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. तर, एकाचा मृत्यू झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे

माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी पहाटे ५:३० वाजता झाला. विमानतळाचे छत कोसळल्याने अनेक वाहने त्याखाली दबली गेली आणि या अपघातात सहा जण जखमी झाले. सर्व जखमींना वाचवण्यात आले असून त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर डोमेस्टिक विमानतळ टर्मिनलबाहेर मोठी वाहतूक कोंडी झाली. दूरदूरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. टर्मिनलचे छत कसे कोसळले याचा सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

हे ही वाचा:

“मुंबई शिक्षक, पदवीधर निवडणुकीत उबाठा सेनेने पैशाचा धुमाकूळ मांडला”

नीट पेपरलीक प्रकरणी सीबीआयची बिहारमधून पहिली अटक, दोघेजण ताब्यात!

आरक्षण प्रश्नासंबंधित २९ जूनला मुंबईत सर्वपक्षीय बैठक

‘कोहलीने १५० किलोचे डंबेल उचलले, म्हणजे रोहित शर्माही तेवढे उचलेल असे नाही!

नोएडामध्ये अनेक ठिकाणी रस्ते पाण्याने भरले होते. त्यामुळे वाहनचालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सेक्टर-९५ मध्ये रस्त्यावर पाणी साचले, त्यामुळे वाहनांचा वेगही कमी झाला. सकाळी साडेसहाच्या सुमारास पाण्यामुळे अनेक वाहनांच्या काचाही फुटल्या. हवामान खात्याने २९ आणि ३० जून रोजी दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, २८ जून रोजी आयएमडीने दिल्ली आणि आसपासच्या भागात ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
166,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा