उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अनूप सोनी यांच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या वडिलांनी आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या आधारावर पोलिसांनी विनयभंग, बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या जबाबानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना ११ जानेवारीच्या रात्री सेवार्ही पोलिस स्टेशन परिसरात घडली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्पवयीन मुलगी रात्री तिच्या वडिलांना जेवण देऊन घरी परतत होती. वाटेत, सपा नेत्याने मुलीला एकटी पाहिले आणि तिला आपल्या दुकानात ओढले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. मुलीने आरडाओरडा करताच आरोपीने तिला दुकानाबाहेर सोडून तेथून पळ काढला. नंतर मुलीने तिच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली.
गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी केली आणि तिचा जबाब नोंदवला. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासत आहेत. गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.
हे ही वाचा :
सैफ अली खान वर हल्ला करणारा बांगलादेशी घुसखोर, ठाण्यातून अटक
भारताचे दोन्ही खो-खो संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत
अजित पवार बीडचे पालकमंत्री, धनंजय मुंडेंचा पत्ता कट
… मग उत्तम जानकर आमदारकीचा राजीनामा देणार!
दरम्यान, गेल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अनूप सोनी यांनी नगर पंचायत शिवराहीमधून अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती. त्यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील समाजवादी पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते प्रचारात गुंतले होते. स्थानिक सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, बलात्काराचा आरोप असणारे अनूप सोनी हे सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या जवळचे मानले जातात. अखिलेश यादव आणि सपाच्या इतर नेत्यांसोबतचा त्यांचा फोटोही फेसबुकवर अपलोड करण्यात आला आहे. आता या घटनेनंतर तो परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.







