34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषमोदी मुंबईत आल्याने मविआत पोटदुखी

मोदी मुंबईत आल्याने मविआत पोटदुखी

नरेंद्र मोदी यांनी एका महिन्यात दोन वेळा महानगरी मुंबईला भेट

Google News Follow

Related

नरेंद्र मोदी यांनी एका महिन्यात दोन वेळा महानगरी मुंबईला भेट दिली. मोदींच्या हस्ते मुंबईत वेगवेगळ्या प्रकल्पांचं आणि योजनांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन केलं गेलं. मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. मोदी दोनवेळा मुंबईत आले, याची पोटदुखी मविआला झालेली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. त्याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात येताहेत अशी वक्तव्ये शरद पवार, संजय राऊत आणि नाना पटोले यांनी केली.

मूळात राजकीय पक्षांचा उद्देशच निवडणूक जिंकायचं असतो. तेव्हा पावसात भिजणं अशा काही गोष्टींचा आधार काहींना घ्यावा लागतो. राजकीय पक्ष फक्त निवडणुकी पुरतेच काम करतात आणि इतर वेळी स्वस्थ बसलेत असे चित्र नसतं. नेते, कार्यकर्ते दिवस-रात्र काम करत असतात, ते आपण लोकांचा पाठिंबा मिळावा, निवडून यावं, सत्तेत यावं याच उद्देशाने प्रयत्न करत असतात. निवडणूक असो किंवा नसो नेतेमंडळी काम करत असतात.

हेही वाचा :

ते १५० वर तर हे अजून ‘५०’ वरच

पुलावामा हल्ल्यातील जवानांना देशभरातून श्रद्धांजली

सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात उद्धव ठाकरे-शिंदे गटातील संघर्षावर सुनावणी

मुंबईतील बीएमसी ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. आधीच पक्ष हातून निसटतोय, आमदार गेलेत आणि जर ही कोंबडीच आपल्या हातून निसटली तर आपली पुरती वाट लागेल अशा भावनेतून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत वारंवार विधानं करत असतात. बीएमसी निवडणूकांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत, इतर वेळी त्यांची महाराष्ट्राकडे पाठ असते असं नाहीए. ते कायमच देशाच्या विकासासाठी, देशाच्या प्रगतीसाठी फिरत असतात. मोदींप्रमाणे सगळ्याच मंत्र्यांनी जनमानसात फिरायला पाहिजे. काही नेते फिरत नाहीत ही वेगळी गोष्ट आहे, घरातूनच कारभार हाकतात, ही अपवादात्मक गोष्ट मानावी लागेल. आणि जे फिरत नाहीत, ते फक्त निवडणूका जवळ आल्या की फिरायला लागतात किंवा फिरायला भाग पडते असे म्हणावे लागेल, कारण ही मंडळी निव़डणूकांपुरती लोकांमध्ये फिरतात. निवडणूका संपल्या की यांचा मिस्टर इंडिया होतो. पुन्हा प्रकटतात पुढच्या निवडणूकीत.

निवडणूका आल्या किंवा स्वतःचं स्थान डळमळीत झालं की यांना मतदारांची आठवण येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे गटाला फुटीचा जो फटका बसलाय हा होय. फुटीनंतर यांना लोकांची आठवण व्हायला लागली. मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला लागले. जुने शिवसैनिक यांना आपलेसे वाटू लागले. लोकं आहेत म्हणून आपण आहोत असा यांना साक्षात्कार झाला. पण हे केव्हा, जेव्हा लोकांची यांना गरज पडली. उद्धव ठाकरे लोकांच्या भेटीगाठी घेऊ लागले. शिवसेना भवनात बसायला लागले. महाराष्ट्र पिंजून काढण्याचा वल्गना करू लागले, भले ते अजूनही मातोश्रीचा अंगण सोडून कुठेही फिरले नाहीत ही वेगळी गोष्ट.

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूका आल्या म्हणून फिरताहेत हे म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्र पिंजून काढावा. त्यांना कोणी रोखलंय का. तुम्हीही फिरा. निवडणुका जिंकण्यासाठी सर्वजण खटपट करत असतो. पक्षवाढीसाठी सर्व नेतेमंडळी प्रयत्न करत असतात. घरी बसून पक्ष वाढत नसतो. त्यासाठी जनमानसात जावे लागते. तेच मोदी करत आलेत आणि हेच मुळी विरोधकांना सळतंय बाकी काही नाही. निवडणूक जिंकली तरच सत्तेत येतात. त्यासाठी मेहनत घ्यावीच लागतेच. फक्त निवडणूक जवळ आली म्हणून काम करायचे असं होत नाही. ही सवय फक्त काँग्रेसला आहे. निवडणुका लागल्या की काम करायचे. वर्षभर गप गुमान राहायचं. त्याचा त्यांना फटकाही बसलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत काँग्रेस पक्षाला मतदारांनी दोन टर्ममध्ये बुडवून टाकलेय. तेव्हा काँग्रेस आणि राहुल गांधी यांना पदयात्रेचा साक्षात्कार झाला. पदयात्रा काढण्याचे कारण म्हणजे काँग्रेसच पक्षाचे स्थान डळमळीत झालेय हाच अर्थ निघतो. त्यामुळे पदयात्रा काढून राहुल गांधींना फिरायला लागले. हेच जर नियमितपणे लोकांमध्ये फिरले असते, लोकांशी संवाद साधला असता, भेटीगाठी घेतल्या असत्या, त्यांची कामं केली असती, त्यांचे प्रश्न सोडवले असते, तर राहुल गांधींना पदयात्रा काढावी लागली नसती. जोपर्यंत पक्ष अडचणीत येत नाही तोपर्यंत काहीही करायचे नाही ही जुनी खोड काँग्रेसमध्ये आहेच, त्याला अजूनही यांना औषध सापडलेलं नाही. लोकांमध्ये गेल्यावर लोकांचे आपल्याबद्दल काय मत आहे हे कळतं. प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढावा यासाठी फिरावं लागतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनमानसात यासाठीच जात असतात, त्यांच्याशी संवाद साधत असतात. निवडणूकीपुरते लोकांना नमस्कार करून जिंकण्याचा चमत्कार कधीच होत नाही आणि होणारही नाही. त्यासाठी लोकांमध्ये कायम उपलब्ध राहावं लागतं, तेव्हा निवडणूक जिंकता येते.

शिवसेनेच्या शाखांमध्ये पूर्वी लोक आपल्या समस्या घेऊन जात असत. रेशनकार्डपासून अगदी छोट्यामोठ्या कामासाठी गर्दी असायची. तो माणूस तेथे का यायचा, तेथे कोणीतरी ऐकून घेणारा माणूस उपलब्ध असायचा. आपले काम होणार अशी खात्री बाळगायचा. आता हेही संपलंय. शाखेची पद्धत हळुहळु लयाला गेली आहे. यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. फिरावं लागतंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे चोवीस तास निवडणुकांचा विचार करूनच काम करत असतात. निवडणुक जिंकली तरच तुम्हाला सत्ता मिळते. त्यानंतर तुम्हाला लोकांचं काम करायची संधी मिळते. त्यासाठी चोवीस तास कामच करावं लागतं. त्यामुळेच भाजपा आज देशभरात आपला डंका वाजवतोय. निवडणुकापुरते मत मागायला आले असते, तर लोकांनी नरेंद्र मोदींना मत दिले नसते. आज नरेंद्र मोदी बाहेर कुठे फिरायला गेले आहेत. आराम करताहेत अशी बातमी ऐकिवात येत नाही. नरेंद्र मोदी कोणत्या ना कोणत्या कामात असतात. देशाची प्रगती व्हावी यासाठी देश-विदेशात फिरत असतात. भारतामध्ये वेगवेगळ्या कामाचं उद्घाटन ते करत असतात. तेथे जाऊन भाषणं करणं, माणसांना भेटणं हे कायम सुरू असतं.

कोरोना काळातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात फिरत होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही बाहेर पडले नाहीत. ते फक्त वाफेचा सल्ला देत बसले. त्याउलट देवेंद्र फडणवीस हॉस्पिटलध्ये जाऊन रुग्णांची, तिथल्या कामाची पाहणी करत होते. त्यावेळेस दोन वेळा देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाही झाला. त्यावेळेस कोणत्या निवडणुका नव्हत्या, तरीही ते फिरत होते. नाहीतर विरोधकांनी त्यावेळेसही निवडणुका आल्या आहेत म्हणून हे फिरताहेत अशी दवंडी पिटायला कमी केले नसती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री तीनवाजेपर्यंत काम करत असतात. त्यावरही विरोधकांनी टीका केली.

प्रत्येक राजकीय पक्ष आपला पक्ष जिंकावा यासाठी काम करत असतात, फिरत असतात. आम्हाला या वेळेस सत्तेत यायचं नाही या हेतूने काम करत नाही. भले विरोधकांना माहितेय की मोदींच्या लाटेत आपण वाहून जाणार आहोत, तरीही ते प्रयत्न करत असतात. प्रत्येक छोट्या-मोठ्या निवडणुकात आपला उमेदवार जिंकावा यासाठी जीवाचं रान प्रत्येक पक्ष करत असतो, यात काहीच वावगं नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा