31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरविशेषआता विमानातही मिळणार इंटरनेट; अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटॅलाइट GSAT- N2 चे यशस्वी उड्डाण!

आता विमानातही मिळणार इंटरनेट; अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटॅलाइट GSAT- N2 चे यशस्वी उड्डाण!

इस्रोकडून SpaceX च्या Falcon 9 रॉकेटच्या सहाय्याने सॅटेलाईट प्रक्षेपित

Google News Follow

Related

भारताचे अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटॅलाइट GSAT- N2 ने यशस्वी उड्डाण केले आहे. भारताची दळणवळण व्यवस्था अधिक उत्तम होण्यासाठी हा उपग्रह महत्त्वाचा ठरणार आहे. इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे हे सॅटेलाईट उद्योगपती एलॉन मस्क यांच्या SpaceX च्या Falcon 9 रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आले आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप कार्निव्हल येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.

GSAT-N2 किंवा GSAT 20 असे या उपग्रहाचे नाव असून त्याचे वजन ४७०० किलोग्रॅम इतके आहे. या सॅटेलाइटच्या सहाय्याने दुर्गम भागांतही इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. या सॅटेलाइटचे मिशन लाईफ हे १४ वर्षांचे असणार आहे.

उपग्रह कार्यान्वित झाल्यानंतर, देशभरात महत्त्वाच्या सेवा प्रदान करेल. ज्यामध्ये दुर्गम भागांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इन- फ्लाइट इंटरनेट सेवा समाविष्ट आहेत. इस्रोचा एक व्यावसायिक विभाग असलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडने (NSIL) या वर्षाच्या सुरुवातीला एलॉन मस्क यांच्या SpaceX सोबत ही मोहीम करण्याची घोषणा केली होती. भारताने ४३० हून अधिक परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले होते परंतु, भारतीय प्रक्षेपण वाहनासाठी हा उपग्रह अवकाशात वाहून नेण्यासाठी खूप जड होता. यामुळे इस्रोच्या SpaceX सोबत भागीदारी आवश्यक होती.

हे ही वाचा:

मणिपूर: केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या अतिरिक्त ५० तुकड्या होणार तैनात

विधानसभा निवडणुकांचा अंदाज व्यक्त करतायत ही वक्तव्यं…

आपमधून नाराज होऊन बाहेर पडल्यानंतर कैलाश गेहलोत यांचा भाजपमध्ये प्रवेश!

उद्धव ठाकरेंसारख्या खाष्ट सासूमुळेचं सगळे शिवसेनेतून बाहेर पडले

जड उपग्रहांसाठी युरोपियन प्रक्षेपण सेवांवर अवलंबून राहण्याच्या इतिहासानंतर हे प्रक्षेपण इस्रो आणि स्पेसएक्स यांच्यातील पहिले व्यावसायिक सहकार्य दिसून आले. एरियनस्पेसमध्ये सध्या ऑपरेशनल रॉकेट नसल्यामुळे आणि भू-राजकीय तणावामुळे रशिया आणि चीनचे पर्याय मर्यादित आहेत, स्पेसएक्स भारतासाठी सर्वात योग्य पर्याय म्हणून उदयास आला आहे. इस्रोचे सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन, LVM- 3, जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये ४००० किलो वजनाचे अंतराळ यान प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे. मात्र, या उपग्रहाचे वजन त्याहून जास्त असल्याने इस्रोला इतर पर्याय पाहणे आवश्यक होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
207,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा