29.2 C
Mumbai
Sunday, May 17, 2026
घरविशेषमुंबई, दिल्ली, गुरूग्रामनंतर बंगळुरूमध्ये टेस्लाचे ‘एक्स्पिरियन्स सेंटर’

मुंबई, दिल्ली, गुरूग्रामनंतर बंगळुरूमध्ये टेस्लाचे ‘एक्स्पिरियन्स सेंटर’

एलन मस्क यांच्या टेस्लाचा भारतातील विस्तार

Google News Follow

Related

एलन मस्क यांच्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी टेस्लाने गुरुवारी बंगळूरूमधील व्हाईटफिल्ड परिसरात आपले पहिले एक्स्पिरियन्स सेंटर सुरू केले. कंपनीच्या भारतातील ईव्ही विस्ताराच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. कंपनीने सांगितले की, आता ग्राहक शहरातील टेक्नॉलॉजी हबमध्ये असलेल्या नव्या शोरूममध्ये मॉडेल वाय आणि नुकतेच लॉन्च करण्यात आलेले मॉडेल वाय एल यांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतील. या वाहनांची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ६१.९९ लाख रुपये आहे.

भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांबाबत वाढती रुची लक्षात घेऊन ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी टेस्लाने व्हाईटफिल्ड येथे आफ्टर-सेल्स सर्व्हिस नेटवर्कही सुरू केले आहे. कंपनीनुसार, सहा आसनी इलेक्ट्रिक एसयूव्ही मॉडेल वाय एल एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ६८१ किलोमीटरपर्यंत (डब्ल्यूएलटीपी) ड्रायव्हिंग रेंज देते आणि अवघ्या पाच सेकंदांत ताशी ० ते १०० किलोमीटर वेग गाठू शकते. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये २,५३९ लिटरपर्यंत कार्गो स्पेस उपलब्ध असून, तीन रांगांची आसन व्यवस्था देण्यात आली आहे. अधिक जागा आणि आराम शोधणाऱ्या कुटुंबांसाठी हे वाहन उपयुक्त मानले जात आहे.

टेस्लाने असेही सांगितले की, मॉडेल वाय आणि मॉडेल वाय एल या दोन्ही वाहनांना अमेरिकेतील एनएचटीएसए आणि आयआयएचएस, युरोपमधील युरो एनकॅप तसेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील एएनकॅप यांसारख्या जागतिक सुरक्षा संस्थांकडून सर्वोच्च सुरक्षा मानांकन मिळाले आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, टेस्ला सुपरचार्जिंग सुविधेमुळे मॉडेल वाय एल केवळ १५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २८८ किलोमीटरपर्यंत धावू शकते. इलेक्ट्रिक वाहन वापरकर्त्यांची सोय लक्षात घेऊन भारतात होम चार्जिंग सपोर्टही उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. टेस्लाने आपल्या अधिकृत वेबसाइटद्वारे मॉडेल वाय एलसाठी बुकिंग सुरू केले आहे. बंगळुरूसह टेस्ला सध्या मुंबईतील बीकेसी, दिल्लीतील एरोसिटी आणि गुरुग्राम येथेही एक्स्पिरियन्स सेंटर चालवत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा