पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आपल्या कारकिर्दीची ११ वर्षे पूर्ण केली आहेत. या कालावधीत महिलांसाठी राबवण्यात आलेल्या जनकल्याणकारी योजनांमुळे त्यांच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ५१ सेकंदांचा एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, गेल्या ११ वर्षांत आपल्या नारीशक्तीने गाठलेली यशशिखरे प्रत्येक देशवासीला अभिमान वाटावा अशी आहेत. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात महिलांसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत लाखो महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले, ज्यामुळे त्यांचे आरोग्य आणि जीवनशैलीत सुधारणा झाली. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाने लिंगसमता आणि मुलींच्या शिक्षणाला चालना दिली. प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यात आले, ज्यामुळे त्यांचा आर्थिक सशक्तीकरणाचा मार्ग खुला झाला. प्रधानमंत्री आवास योजनेत महिलांच्या नावे घरांचे मालकी हक्क दिले गेले, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक सुरक्षेला बळकटी मिळाली. या सर्व योजनांमुळे महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले आणि समाज व अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा ठरला.
पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले “आपल्या मातांनी, बहिणींनी आणि मुलींनी तो काळ अनुभवला आहे जेव्हा प्रत्येक पावलागणिक त्यांना अडचणींना सामोरे जावे लागायचे. पण आज त्या केवळ विकसित भारताच्या संकल्पात भाग घेत नाहीयेत, तर शिक्षणापासून व्यवसायापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आदर्श निर्माण करत आहेत. गेले ११ वर्षे आपल्या नारीशक्तीची यशोगाथा देशवासीयांना अभिमान वाटावी अशी आहे.”
हेही वाचा..
श्रीनगर आणि कटरा दरम्यान वंदे भारत सुरू
‘सैय्यारा’च्या रेकॉर्डिंगदरम्यान काय घडलं होत ?
मायानगरी सोडून गावी का स्थायिक झाले नाना पाटेकर?
संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने
दुसऱ्या एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी नमूद केले की, “मागील ११ वर्षांत एनडीए सरकारने महिलांच्या नेतृत्वातील विकासाची नवी व्याख्या साकारली आहे. स्वच्छ भारत अभियानाने महिलांना सन्मान मिळवून दिला, तर जनधन खात्यांमुळे आर्थिक समावेशन शक्य झाले. उज्ज्वला योजनेने लाखो घरांमध्ये धूरमुक्त स्वयंपाकघर सुनिश्चित केले. मुद्रा कर्जांनी लाखो महिला उद्योजकांच्या स्वप्नांना पंख दिले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महिलांच्या नावे घरांची नोंद झाल्यामुळे त्यांना आर्थिक आणि सामाजिक आधार मिळाला. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ मोहिमेने मुलींच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय आंदोलनाची ठिणगी पेटवली. विज्ञान, शिक्षण, क्रीडा, स्टार्टअप्स आणि सशस्त्र दलांमध्येही महिलांनी उल्लेखनीय कामगिरी करत अनेकांना प्रेरणा दिली आहे.”
