भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने कर्नाटकातील दोन आमदारांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे. आमदार एसटी सोमशेखर आणि ए शिवराम हेब्बर अशी काठून टाकण्यात आलेल्या आमदारांची नावे आहेत. ‘वारंवार पक्ष शिस्तीचे उल्लंघन’ केल्यामुळे पक्षाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पक्षाच्या केंद्रीय शिस्तपालन समितीचे सदस्य सचिव ओम पाठक यांनी जारी केलेल्या पत्रात भाजपने म्हटले आहे की, २५ मार्च २०२५ रोजीच्या कारणे दाखवा नोटीसला हेब्बर आणि सोमशेखर यांनी पाठवलेल्या उत्तरांचा विचार केला गेला. तथापि, समितीला स्पष्टीकरण असमाधानकारक वाटले आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
कर्नाटक भाजप अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी दोन्ही नेत्यांना भाजपमधून काढून टाकल्याची माहिती दिली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पक्षाच्या हायकमांडने बराच विचारविनिमय करून हा निर्णय घेतला. दरम्यान, एसटी सोमशेखर हे भाजपच्या तिकिटावर यशवंतपूर आणि ए शिवराम हेबर येल्लापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
दरम्यान, दोन्ही नेते मूळतः काँग्रेसचे भाग होते आणि २०१९ मध्ये ‘ऑपरेशन लोटस’ द्वारे भाजपमध्ये सामील झाले. नंतर त्यांनी भाजप सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले. मार्च २०२४ च्या राज्यसभा निवडणुकीत, सोमशेखर यांनी पक्षाचे व्हीप असूनही, काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांच्या बाजूने क्रॉस-व्होटिंग केले होते, तर हेब्बर यांनी मतदानापासून पूर्णपणे दूर राहिले. दोन्ही कृतींना पक्षातील बंडखोरी म्हणून पाहिले गेले. अखेर पक्षाने दोनही आमदारांवर कारवाई करत त्यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.
हे ही वाचा :
झारखंडमध्ये चकमक, नक्षलवादी कमांडर तुलसी भुईया ठार!
सरदार पटेलांना वाटत होते की, POK घेतल्याशिवाय थांबायचे नाही, पण त्यांचे कुणी ऐकले नाही!
पंजाब किंग्सची सिंहगर्जना – मुंबई इंडियन्सचा सात विकेटांनी पराभव
स्फोटकांचा साठा परत घेण्यासाठी आला आणि अचानक स्फोट झाला!
दरम्यान, यापूर्वी, भाजपने माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि प्रदेश भाजप अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्याविरुद्ध अपमानास्पद विधाने केल्याबद्दल पक्षाचे ज्येष्ठ आमदार आणि कट्टर हिंदुत्ववादी नेते बसनगौडा पाटील यत्नाल यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले होते.
