सोमवारी पहाटे हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना दुबईहून उड्डाण करणारे एक मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरून समुद्रात कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार , विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार पहाटे ३:५० वाजता हा अपघात झाला आणि त्यात तुर्की मालवाहू विमान कंपनी AirACT द्वारे चालवले जाणारे बोईंग ७४७ मालवाहू विमान एमिरेट्सच्या फ्लाइट नंबरखाली उड्डाण करत होते.
“या घटनेनंतर हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उत्तरेकडील धावपट्टी बंद करण्यात आली आहे,” असे प्राधिकरणाने एका निवेदनात म्हटले आहे. तर “दक्षिण आणि मध्य धावपट्टी अजूनही कार्यरत आहेत,” असे सांगितले.
स्थानिक प्रसारक टीव्हीबीने वृत्त दिले की, तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. विमानतळाने सांगितले की, विमानातील चार क्रू मेंबर्सना वाचवण्यात आले, ज्यात एका ग्राउंड स्टाफ मेंबरचा समावेश होता, तर अपघातानंतर पहाटे आणखी एक व्यक्ती बेपत्ता होती.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टने पोलिसांचा हवाला देत अपघातात दोघांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. फ्लाइट-ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटराडार२४ ने एक्सवर एका पोस्टद्वारे सांगितले की अपघातग्रस्त विमान हे बोईंग ७४७एफ मालवाहू विमान होते. हे विमान एअरएसीटीकडे नोंदणीकृत असून, ही तुर्की मालवाहतूक कंपनी विविध प्रमुख विमान कंपन्यांना अतिरिक्त वाहतूक क्षमता पुरवते, असेही पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
पॅरिसच्या लूव्र संग्रहालयात चोरी: ७ मिनिटांत १९ व्या शतकातील आठ शाही दागिने गायब
“भारताने रशियन तेल खरेदी थांबवली नाही तर…” डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
देशवासियांना आनंद, समृद्धी लाभो! पंतप्रधान मोदींकडून दिवाळी शुभेच्छा
दिव्यांगांचे सशक्तीकरण: आत्मनिर्भरतेच्या प्रवासाला गती
हाँगकाँगच्या नागरी विमान वाहतूक विभागाने सांगितले की त्यांनी अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी घटनेची औपचारिक चौकशी सुरू केली आहे. एमिरेट्सने एका निवेदनात म्हटले आहे की, हाँगकाँगमध्ये लँडिंग करताना फ्लाइट EK९७८८ चे नुकसान झाले आणि ते बोईंग ७४७ कार्गो विमान होते जे ACT एअरलाइन्सकडून भाड्याने घेतले होते आणि ते चालवत होते. “चालक दल सुरक्षित असल्याची पुष्टी झाली आहे आणि विमानात कोणताही माल नव्हता,” असे एमिरेट्सने म्हटले आहे.







