31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरविशेषदिल्लीतील निर्णय आम्हालाही मान्य, शेवटी प्रत्येकाच्या संख्येकडेही पाहिलं जातं

दिल्लीतील निर्णय आम्हालाही मान्य, शेवटी प्रत्येकाच्या संख्येकडेही पाहिलं जातं

अजित पवार यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह यांचा निर्णय मान्य असल्याचे म्हटले. याच दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांचेही वक्तव्य समोर आले आहे. दिल्लीतील निर्णय आम्हालाही मान्य असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच यासाठी प्रत्येकाची संख्या देखील पाहिली जाते, असे अजित पवार यांनी म्हटले. छत्रपती संभाजी नगरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

ते म्हणाले, उद्या आम्ही तिन्ही नेते उद्या दिल्लीला जाणार आहोत उर्वरीत चर्चा तिथे होणार आहे. त्यानंतर राज्याचा नवा मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ हे निश्चित होईल. पुढे अधिवेशनाचा काळ आहे, बरीच कामे आहेत. मात्र, सर्वजण अनुभवी असल्यामुळे अडचण येणार नसल्याचेही ते म्हणाले.

दिल्लीच्या उद्याच्या मिटींगमध्ये जो काही निर्णय घेतला जाईल, तो आम्हाला देखील मान्य असेल. मुख्यमंत्री म्हणून तुमचेही नाव चर्चेत होते, तुमच्या कार्यकर्त्यांची मागणी होती, असा प्रश्न विचारला असता. ते म्हणाले, कार्यकर्त्यांना काहीही वाटत असले तरी शेवटी, प्रत्येकाची संख्या, कोणाचे किती लोक निवडून आले याकडेही पाहिले जाते. मागच्या अडीच वर्षा पाठीमागची गोष्ट वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी असल्याचे त्यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा, शिंदेंनी दिला पाठींबा

मविआकडून १४ कोटी मतदारांचा अपमान!

झारखंडमध्ये भाजपला मतदान केले म्हणून हिंसाचार

हिजबुल्ला-इस्रायलमधील युद्ध थांबले !

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
207,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा