31 C
Mumbai
Sunday, April 26, 2026
घरराजकारण“माझ्या जीवाला धोका; काही झाल्यास खासदार संजय राऊत जबाबदार”

“माझ्या जीवाला धोका; काही झाल्यास खासदार संजय राऊत जबाबदार”

डॉ. स्वप्ना पाटकर यांचा गंभीर आरोप

Google News Follow

Related

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धक्कादायक पोस्ट करत डॉ. स्वप्ना पाटकर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “माझ्याबाबत काहीही घडले—अपघात, शारीरिक इजा किंवा मी गायब झाले—तर त्यासाठी शिवसेना (उबाठा गट)चे खासदार संजय राऊत पूर्णपणे जबाबदार असतील.”


या पोस्टमध्ये पाटकर यांनी पुढे दावा केला आहे की त्यांच्या आगामी पुस्तकात काही “महत्त्वाच्या सत्य गोष्टी” उघड होणार आहेत. या खुलास्यांना थांबवण्यासाठी त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. “मी गप्प बसणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींना ‘दहशतवादी’ संबोधल्याबद्दल मल्लिकार्जुन खर्गेंना नोटीस

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जागतिक तणावाचा परिणाम

मुर्शिदाबादमध्ये तृणमूल आणि हुमायून कबीर यांच्या पक्षाचे कार्यकर्ते भिडले

ट्रम्प यांना पाकिस्तानची मध्यस्थी का हवी? त्याचा अखेर उलगडा झाला!

या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे, तर काहींनी पाटकर यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, डॉ. स्वप्ना पाटकर आणि खासदार संजय राऊत यांच्यातील एक ऑडिओ क्लिप यापूर्वी व्हायरल झाली होती. त्या क्लिपमध्ये राऊत यांनी पाटकर यांना शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पाटकर यांनी राऊत यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला होता, भारतीय दंड विधानाच्या कलम ५०९, ५०६ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. डॉ. पाटकर या पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांच्याविरोधातील साक्षीदार आहेत. त्या मुंबईतील सांताक्रूझ येथे राहतात आणि व्यावसायिकदृष्ट्या मानसोपचारतज्ज्ञ असून त्यांचे स्वतःचे क्लिनिक आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा