28.9 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरदेश दुनियाऑस्ट्रियातील भारताच्या राजदूतांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या पंचतंत्राच्या कथा

ऑस्ट्रियातील भारताच्या राजदूतांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या पंचतंत्राच्या कथा

‘गुरुकुल डिप्लोमसी’ची चर्चा

Google News Follow

भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रियातील भारताचे राजदूत शंभू कुमारन यांनी व्हिएन्नातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी पंचतंत्र कथांचे विशेष कथाकथन सत्र आयोजित केले. या उपक्रमाद्वारे भारतीय संस्कृती, मूल्ये आणि साहित्याची ओळख ऑस्ट्रियन मुलांना करून देण्यात आली. या कार्यक्रमापूर्वी भारतीय दूतावासाने ऑस्ट्रियन विद्यार्थ्यांसाठी पंचतंत्राच्या कथांचा जर्मन भाषेतील अनुवाद प्रकाशित केला होता. या पुस्तकातील निवडक कथा राजदूत शंभू कुमारन यांनी विद्यार्थ्यांना वाचून दाखवल्या. कथाकथनानंतर त्यांनी मुलांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत छायाचित्रेही काढली.

भारतीय दूतावासाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये या उपक्रमाला ‘गुरुकुल डिप्लोमसी’ असे संबोधत, भारतीय ज्ञानपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. जर्मन भाषेतील पंचतंत्राच्या या आवृत्तीला प्रसिद्ध ऑस्ट्रियन चित्रकार क्लॉस पिटर यांनी आकर्षक चित्रांची जोड दिली आहे. त्यामुळे भारतीय लोककथा लहान मुलांना अधिक रंजक आणि सहज समजतील, असा दूतावासाचा विश्वास आहे.

भारतीय दूतावासाने यापूर्वी ‘Geschichten aus dem Panchatantra’ या जर्मन भाषेतील व्हिडिओ पॉडकास्ट मालिकेचाही शुभारंभ केला होता. प्रसिद्ध ऑस्ट्रियन लेखक आणि पॉडकास्टर थॉमस ब्रेझिना यांच्या आवाजात पंचतंत्रातील कथा डिजिटल माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. व्हिएन्ना शहर प्रशासन आणि स्थानिक शाळांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘Bounce Back’ उपक्रमाचा हा भाग असून, डिजिटल माध्यमातून भारतीय संस्कृती आणि जीवनमूल्यांचा प्रसार करण्यावर भर देण्यात आला आहे. या कार्यक्रमाला व्हिएन्नातील एका शाळेतील ५० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. कथाकथनानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या पंचतंत्रातील पात्रांविषयी सांगितले तसेच त्या कथांमधून मिळालेल्या शिकवणीबाबत उत्साहाने चर्चा केली.

हे ही वाचा:

साकीनाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू

“ताकाइची माझी धाकटी बहीण”; मोदींनी भारत- जपान संबंधांना दिला नवा आयाम

व्हेनेझुएलात भारताच्या ‘ऑपरेशन अमिस्ताद’चे कौतुक

होर्मुझमधील गोळीबारानंतर कच्चे तेल घेऊन जहाज भारतात दाखल

दरम्यान, एप्रिल महिन्यात ऑस्ट्रियाचे चान्सलर क्रिश्चियन स्टॉकर यांनी भारताचा दौरा केला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्टॉकर यांच्यात नवकल्पना, पायाभूत सुविधा, शाश्वत विकास, संरक्षण, सेमिकंडक्टर, स्टार्टअप्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली होती. या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी भारत-ऑस्ट्रिया संबंध भविष्यात अधिक मजबूत, नवोन्मेषाधारित आणि दूरदृष्टीपूर्ण बनतील, असा विश्वास व्यक्त केला होता.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा