29 C
Mumbai
Friday, September 11, 2026
घरसंपादकीयऑपरेशन सिंदूरनंतर EOS-05 ही गरज होती

ऑपरेशन सिंदूरनंतर EOS-05 ही गरज होती

Google News Follow

Related

भारतने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर देशाला आपली बलस्थाने लक्षात आली तशा सुरक्षा व्यवस्थांमध्ये असलेल्या त्रुटीही लक्षात आल्या. या त्रुटी दूर करण्यासाठी इस्त्रोने राबवलेल्या दोन मोहिमा अपयशी ठरल्या. या अपयशामागे काही फंदफितुरी आहे का? चीन किंवा पाकिस्तानने काही दगाफटका केलाय का? अशी चर्चा होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या प्रकरणी लक्ष घातले, त्यावरून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात यावे. जे काही घडले ते उघड झाले नाही, सर्वसामान्य जनतेपर्यंत ते येईल याची अजिबात शक्यता नाही. परंतु भारताने चूकांमधून धडा घेत अपयशाची मालिका खंडीत केली हे मात्र निश्चित. ४ सप्टेंबर रोजी EOS-05 हा उपग्रह जिओसिंक्रोनस ऑर्बिट अर्थात भूस्थिर कक्षेत पोहचवण्यात इस्त्रोला यश आले.

EOS-05 चा वापर नागरी आणि लष्करी कामांसाठी केला जाणार आहे. हवामान, शेती, पर्यावरणावर लक्ष ठेवण्यासाठी हा उपयुक्त आहेच, शिवाय हिंद महासागर, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा किंवा नियंत्रण रेषेवर २४ सतत नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. ईस्त्रोची ही यशस्वी कामगिरी एकाच वेळी भारताचे अर्थकारण आणि सुरक्षेला बळ देणार आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या दोन मोहिमा अपयशी ठरल्या. त्यात मे २०२५ मध्ये पीएसएलव्ही -सी ६१ आणि जानेवारी २०२६ मधील पीएसएलव्ही-सी ६२ या दोन मोहिमांचा समावेश आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा झालाच, त्याही पेक्षा मोठा दुष्परिणाम म्हणजे इस्त्रोतील शास्त्रज्ञांसाठी हा धक्का होता. जागतिक स्तरावर इस्त्रोच्या विश्वासार्हतेला तडा जाईल की काय, अशी शंका निर्माण कऱणारे हे अपयश होते.

पीएसएलव्ही -सी ६१ ही मोहीम ऑपरेशन सिंदुर नंतर अवघ्या ८ दिवसांनी म्हणजे १८ मे रोजी हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत EOS 09 हा उपग्रह ठरलेल्या कक्षेत स्थापित होऊ शकला नाही. दुसऱ्या मोहिमेत रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यातच बिघाड झाला. पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी सोडलेल्या अन्वेषा या उपग्रहासह १५ सह उपग्रह बरबाद झाले. कमी पैशात कमाल करण्याचा इतिहास असलेल्या इस्त्रोच्या लौकीलाला लागलेले हे डाग होते. परंतु अपयशाने न खचता, आधीच्या चुकांपासून धडा घेत इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना कंबर कसली.

४ सप्टेंबर २०२६ रोजी अपयशाची ही मालिका खंडीत करण्यात इस्त्रोला यश आले. ईस्त्रोने प्रक्षेपित केलेला EOS-05 हा उपग्रह भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ऑपरेशन सिंदूरच्या काळात आपल्याला अशा प्रकारच्या उपग्रहाची उणीव भासली होती. कारण या उपग्रहात २४ तास पाळत ठेवण्याची क्षमता आहे. ज्याची आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या काळात गरज होती.

भारताकडे असलेल्या उपग्रहांमध्ये लोअर अर्थ ऑर्बिट सॅटेलाईटचा समावेश आहे. हे उपग्रह पृथ्वीपासून जवळ असतात. ते सतत २४ तास एका भूभागावर लक्ष ठेवू शकत नाहीत. दिवसातून ठराविक वेळी ते एकेका क्षेत्रावरून जातात. पृथ्वीपासून हे उपग्रह १६० ते २००० किमी अंतरावर असतात. परंतु EOS-05 हा भू-स्थिर कक्षेत (जिओसिंक्रोनस ऑर्बिट) मध्ये तैनात असतो. म्हणजे पृथ्वीपासून ३५,७८६ किमी अंतरावर. इतक्या उंचावर प्रस्थापित करण्यात आलेला हा भारताचा पहिला उपग्रह. श्रीहरी कोटा येथील सतीश धवन स्पेस स्टेशन येथून जीएसएलव्ही एफ-१७ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून २३६७ किलो वजनाचा हा उपग्रह भूस्थिर कक्षेत प्रस्थापित कऱण्यात आला. जीएसएलव्ही एफ-१७ च्या पहील्या टप्प्यात घन, दुसऱ्या टप्प्यात द्रव आणि तिसऱ्या टप्प्यात स्वदेशी क्रायोजेनिक तंत्राचा वापर करण्यात आला. अर्थात ऋण २५३ सेल्सिअस तापमान असलेला द्रव हायड्रोजन आणि ऋण १८३ सेल्सिअस तापमान असलेले द्रव ऑक्सिजन यांचा वापर अखेरच्या टप्प्यात इंधन म्हणून करणे. हे अत्यंत जटील आणि गुंतागुंतीचे तंत्रज्ञान जे रशियासह जगाने आपल्याला नाकारले ते आपण भारतात निर्माण केले. ४ सप्टेंबर रोजी त्याचा यशस्वी वापर कऱण्यात आला.

एखादा कॅमेरा टॉप एंगलने सर्व काही एकाच वेळी पाहू शकतो तसाच हा उपग्रह एकाच वेळी सगळ्या भारतीय उपखंडावर लक्ष ठेवून शकतो. भारताचा भूभाग, नियंत्रण रेषा (LoC), वास्तविक नियंत्रण रेषा (LAC) आणि हिंदी महासागरातील सर्व घडामोडींवर सतत २४ तास नजर ठेवू शकतो. सिंथेटीक एपरर्चर रडारने सज्ज असल्यामुळे कारगिल/द्राससारख्या उंच आणि ढगाळ प्रदेशात जिथे सामान्य कॅमेऱ्यांना मर्यादा येतात, तिथे रात्रीच्या वेळी किंवा दाट ढग/धुक्यातूनही शत्रूच्या हालचालींचे स्पष्ट फोटो घेण्याची क्षमता या उपग्रहात असते.

हे ही वाचा:

बिहारमध्ये गंगा नदीचा रौद्रावतार

‘हनुमान अंश’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान ३७६ गोविंदा जखमी

ब्रिक्सचा नवा आर्थिक रोडमॅप

चीनने उपग्रहांचे जबरदस्त जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे भारत या प्रांतात मागे राहू शकत नाही. सीमेवरील शत्रूच्या हालचालींना तोंड देण्यासाठी भारताला एका जागी स्थिर राहून सतत चित्रे टिपणाऱ्या ‘Eye in the Sky’ ची गरज होती. EOS-05 दर ३० मिनिटांनी संपूर्ण भारताचे तर दर ५ ते १० मिनिटांनी एका विशिष्ट भागाचे उच्च-गुणवत्तेचे फोटो पाठवू शकतो. २०२१ मध्ये EOS-03 उपग्रह गमावल्यामुळे भारताच्या अंतराळ-आधारित सतत निरीक्षणाच्या क्षमतेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती, जी भरून काढणे तातडीचे होते. EOS-05 सारखे जिओसिंक्रोनस ऑर्बिट पृथ्वीचे निरक्षण करणारा उपग्रह येण्यापूर्वी आपण सीमावर्ती आणि दुर्गम भागातील देखरेखीसाठी प्रामुख्याने ४ मार्गांवर अवलंबून होतो.

भारताकडे आधीपासून कोर्टोसॅट आणि रिसॅट सारखे उत्तम उपग्रह आहेत. हे उपग्रह पृथ्वीपासून अगदी जवळच्या कक्षेत फिरत असल्याने ते भूभागावरून दिवसातून फक्त १ किंवा २ वेळा जात असतात. दोन फेऱ्यांच्या मधील काही तासांच्या काळात काय घडले, याबाबत हे उपग्रह अंधारात असतात. याला उपग्रहांचे ब्लाईंड स्पॉट म्हणतात. भारताने १९९८ साली पोखरणमध्ये जी दुसरी अणुचाचणी घेतली, त्यावेळी अमेरिकी उपग्रहांची भारतावर बारीक नजर होती. अमेरिकी उपग्रहांना चकवा देण्यासाठी आपण त्या उपग्रहांचा ब्लाईंड स्पॉट वापरला होता. आपण जी कृप्ती वापरली ती शत्रूकडून सुद्धा वापरली जाऊ शकते. आपल्या उपग्रहांच्या ब्लाईंड स्पॉटचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्या पृथ्वी कक्षेजवळील उपग्रहांना अन्य काही गोष्टींची जोड द्यावी लागते. त्यामुळे त्यांना जोड लागते. लढाऊ विमाने किंवा ड्रोन्सच्या माध्यमातून सीमावर्ती भागाचे फोटो घ्यावे लागतात.  अनेकदा ड्रोन्सची रेंज मर्यादित असणे किंवा वाईट हवामान यामुळे अडचणी येतात. शत्रूच्या अँटी-एयरक्राफ्ट क्षेपणास्त्रांचाही धोका असतो.

अत्यंत दुर्गम किंवा बर्फाच्छादित भागात सैनिकांना स्वतः जाऊन गस्त घालावी लागते. हे वेळखाऊ काम असते. उंच पर्वतांवर, दऱ्याखोऱ्यात किंवा दाट धुक्यात शत्रूची हालचाल सैनिकांच्या नजरेतून सुटण्याची शक्यता असते.  सीमेपलीकडील खबऱ्यांकडून किंवा स्थानिक सूत्रांकडून मिळालेली माहिती वेळेवर येईलच याची खात्री नसते. या सगळ्या समस्या EOS-05 मुळे सुटणार आहेत. उपग्रहांच्या ब्लाईंड स्पॉटमधून लष्कराची सुटका होणार आहेत. EOS-05 सारख्या जिओसिंक्रोनस अर्थ ऑब्झर्व्हेशन उपग्रहामुळे हे सर्व ‘ब्लाइंड स्पॉट्स’ नष्ट होऊन एकाच जागेवरून २४/७ थेट फीड मिळणे शक्य झाले आहे.

चक्रीवादळे, ढगफुटी, पुराची परिस्थिती, जंगलातील वणवे आणि हिमालयातील हिमनद्यांमधील बदलांवर त्वरित आणि अचूक लक्ष ठेवण्यासाठी हा उपग्रह अत्यंत प्रभावी ठरणार आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची घोडदौड थांबलेली नाही, हे ईस्त्रोने या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध केलेले आहे. भारतीयांची मान उंचावेल, भारताच्या प्रगतीत मोडता घालणाऱ्या विकसित राष्ट्रांना पोटदुखी निर्माण करणारे आणि चीन-पाकिस्तानच्या पोटात धडकी भरवणारे हे यश आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
332,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा