28.9 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरबिजनेसकोटक महिंद्रा बँकेचा दमदार तिमाही निकाल; नफ्यात २२.६ टक्क्यांची झेप

कोटक महिंद्रा बँकेचा दमदार तिमाही निकाल; नफ्यात २२.६ टक्क्यांची झेप

जून तिमाहीत निव्वळ नफा ५,४८०.४६ कोटी रुपयांवर

Google News Follow

खासगी क्षेत्रातील आघाडीची कोटक महिंद्रा बँकेने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. जून २०२६ अखेर संपलेल्या तिमाहीत बँकेचा एकत्रित (कन्सोलिडेटेड) निव्वळ नफा वार्षिक आधारावर २२.६ टक्क्यांनी वाढून ५,४८०.४६ कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा नफा ४,४७२.१८ कोटी रुपये होता. बँकेच्या व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ, शुल्कातून होणारी कमाई आणि कर्जवाटपातील सातत्यपूर्ण वाढ यामुळे ही कामगिरी शक्य झाली.

बँकेचा स्वतंत्र (स्टँडअलोन) निव्वळ नफा देखील लक्षणीय वाढून ४,१२२.९६ कोटी रुपये झाला आहे. निव्वळ व्याज उत्पन्नात (NII) सुमारे ९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. याशिवाय बँकेच्या ठेवींमध्ये (Deposits) आणि कर्जवाटपात (Advances) दुहेरी अंकातील वाढ झाली असून, ग्राहकांचा वाढता विश्वास आणि मजबूत व्यवसाय विस्तार याचे हे संकेत मानले जात आहेत.
हे ही वाचा:
‘विक्रम-१’ने लिहिला इतिहास; आता भारत सज्ज जागतिक स्पेस मार्केट जिंकण्यासाठी!

एसआयआरमध्ये उघड झाले मालेगावचे धक्कादायक वास्तव

वांगचुक यांचा रुग्णालयातून संदेश, २० जुलैला दुसरा स्वातंत्र्य लढा

हरित ट्रॅकवर वेगात; हायड्रोजन ट्रेन झोकात

तथापि, बँकेच्या नेट इंटरेस्ट मार्जिन (NIM) मध्ये मागील वर्ष आणि मागील तिमाहीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. तरीही बुडीत कर्जासाठी करण्यात येणाऱ्या तरतुदींमध्ये (Provisions) मोठी घट झाल्याने नफ्याला चांगला आधार मिळाला. बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता (Asset Quality) देखील स्थिर राहिली असून, सकल अनुत्पादित मालमत्ता (Gross NPA) प्रमाणात किरकोळ सुधारणा झाली आहे.

एकूणच, मजबूत कर्जवाढ, वाढते ठेवींचे प्रमाण, नियंत्रित जोखीम आणि कमी तरतुदी यांच्या बळावर कोटक महिंद्रा बँकेने आर्थिक वर्षाची सुरुवात सकारात्मक केली आहे. त्यामुळे आगामी तिमाहींमध्येही बँकेच्या कामगिरीकडे गुंतवणूकदार आणि बाजाराचे लक्ष लागून राहणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा