दिवाळी – फक्त सण नाही, ही आहे मनं उजळवणारी एक भावना…
दिवाळी म्हणजे फक्त घर सजवणं, दिवे लावणं आणि मिठाई वाटणं नाही. दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. आशेचा किरण. प्रत्येक वर्षी आपण आपलं घर, आपले रस्ते, आपला परिसर उजळवतो, पण या दिव्यांच्या प्रकाशातही काही चेहरे असे असतात जे केवळ दूरूनच त्या उजेडाकडे पाहत राहतात.
होय, हेच ते चेहरे – जे आपल्यासारखे सण साजरे करू शकत नाहीत, पण ज्यांच्या डोळ्यांतही स्वप्नं असतात, आणि ज्यांच्या मनातही दिवाळीच्या गोड आठवणींची आस असते.
याच भावनेतून एनएसई (National Stock Exchange) ने या वर्षी एक वेगळी, हृदयस्पर्शी मोहिम हाती घेतली – ‘#ExchangeHappiness’.
या उपक्रमाने आनंद द्वीगुणीत करण्याचा चांगला प्रयत्न केला.
एनएसईच्या या कॅम्पेनमध्ये मेंबर्स, कंपन्या आणि कर्मचारी सगळेच सहभागी झाले. प्रत्येकाने आपली पर्सनलाइज्ड दिवाळी ग्रीटिंग तयार केली आणि सोशल मीडियावर शेअर केली.
या प्रत्येक पोस्टच्या बदल्यात एनएसईने आपल्या वतीने गरजू मुलांना आणि कुटुंबांना गिफ्ट्स आणि मिठायांचे वाटप केले.
जिथे साधनं नव्हती पण स्वप्नं होती… जिथे हात रिकामे होते पण आशा होत्या… तिथे पोहोचवला गेला “एनएसईचा प्रकाश”.
एनएसईने ही मोहीम नाना पालकर स्मृती समितीच्या सहकार्याने राबवली – एक अशी संस्था जी वर्षानुवर्षे गरजूंना हात देत आली आहे.
या उपक्रमातून एनएसईने फक्त दिवेच नव्हे तर मनांमध्येही उजेड पेटवला.
ही दिवाळी एनएसईसाठी वेगळी ठरली — कारण त्यांनी दिले फक्त दिवे नाही, तर दिली उम्मीदची ज्योत.
ज्या लोकांपर्यंत कधी प्रकाश पोहोचत नव्हता, तिथे “Exchange Happiness” ने नवीन उमेद, नवीन विश्वास, आणि एक छोटा पण अर्थपूर्ण बदल आणला.
हेही वाचा :
विराटला नकोय सचिन-सूर्याचा “तीन शून्यांचा” विक्रम
अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्याविरुद्ध बागपतमध्ये गुन्हा दाखल!
दिवाळीत फटाके फोडल्यामुळे महिलां- मुलांवर मारहाण करणाऱ्या SP ची बदली!
दिवाळीचा खरा अर्थ हाच ना — जिथे अंधार आहे तिथे प्रकाश नेणं, जिथे दु:ख आहे तिथे हसू देणं, आणि जिथे अपेक्षा आहेत तिथे आशा फुलवणं.
एनएसईच्या या हृदयस्पर्शी मोहिमेने दाखवून दिलं — सण फक्त साजरे करण्यासाठी नसतात, तर ते वाटण्यासाठी असतात.
जशी आपण प्रत्येक दिवाळीला आपलं घर उजळवतो, तशीच प्रत्येकाने आपल्या मनातही एखाद्या दुसऱ्याच्या आनंदाची ज्योत पेटवावी — हीच खरी दिवाळी!







