29 C
Mumbai
Monday, October 2, 2023
घरअर्थजगतदोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची काय आहेत कारणे?

दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची काय आहेत कारणे?

२००० च्या नोटा मागे घेण्याचा निर्णय नोटांबंदीचा नाही

Google News Follow

Related

रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा ते बँकखात्यात जमा करू शकतात किंवा इतर मूल्यांसाठी बदलू शकतात. हे सन २०१६च्या नोटाबंदीसारखे नाही, असे रिझर्व्ह बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. २३ मेपासून ते ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा बँक खात्यात जमा करता येणार आहेत.

रिझर्व्ह बँक कायदा १९३४च्या कलम २४(१) अंतर्गत नोव्हेंबर २०१६मध्ये दोन हजार रुपये मूल्याची चलनी नोट सादर करण्यात आली होती. त्यावेळी चलनात असलेल्या सर्व ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दोन हजार रुपयांची नोट आणल्याने अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असणाऱ्या चलनाच्या गरजा जलदगतीने पूर्ण झाल्या, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सन २०१८-१९मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.

तसेच, सामान्य लोकांकडून व्यवहारांसाठी दोन हजार रुपयांच्या नोटांचा वापर केला जात नाही, असेही कारण या नोटा चलनातून मागे घेण्यामागे आहे, असेही आरबीआयने म्हटले आहे.

या नोटांचे मूल्य गेल्या काही वर्षांत घसरले आहे. ३१ मार्च २०२३पर्यंत चलनात असलेल्या नोटांच्या तुलनेत या दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण केवळ १०.८ टक्के आहे. दुसरे कारण म्हणजे नोटांचा इतर मूल्यांचा साठा लोकांच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसा आहे, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

हा निर्णय ‘क्लीन नोट पॉलिसी’च्या अनुषंगाने घेतला गेल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. लोकांना चांगल्या दर्जाच्या नोटांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी हे धोरण आहे.

हे ही वाचा:

केजरीवाल यांच्या आनंदावर केंद्र सरकारने फिरवला बोळा

मिनी नोटबंदी; २००० च्या नोटा ३० सप्टेंबर नंतर बंद

चंद्राबाबू म्हणतात, दोन हजार नोटांवरील बंदीचा निर्णय उत्तम

हिंदू निर्वासितांच्या घरावर चालवला बुलडोझर

हे सन २०१६च्या नोटाबंदीसारखे नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सन २०१६मध्ये सर्व ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. तेव्हा त्या अवैध ठरवण्यात आल्या होत्या. मात्र दोन हजार रुपयांच्या नोटा या वैधच राहतील, त्यांचा वापर करण्यास बंदी नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
102,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा