30.3 C
Mumbai
Monday, May 18, 2026
घरक्राईमनामा‘नीट’ पेपरफुटी प्रकरण: आरसीसी क्लासेसचे शिवराज मोटेगावकर यांना अटक

‘नीट’ पेपरफुटी प्रकरण: आरसीसी क्लासेसचे शिवराज मोटेगावकर यांना अटक

शिकवणी वर्गाच्या कार्यालयातून अनेक कागदपत्रे सीबीआयने केली होती जप्त

Google News Follow

Related

नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठी कारवाई केली आहे. लातूरच्या आरसीसी शिकवणी वर्गाचे प्रमूख शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली आहे. रविवारी दुपारी २ वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू होती. दोन दिवसापूर्वी त्यांच्या शिकवणी वर्गाच्या कार्यालयातून अनेक प्रकारचे कागदपत्रे सीबीआयने जप्त केले होते. मात्र, त्यांना ताब्यात घेतले नव्हते. यानंतर कारवाई करत त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि चौकशी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचे समजल्यानंतर या शिकवणीवर्गातून ४२ प्रश्ने ‘नीट’ परीक्षेत आल्याची तक्रार एका पालकाने केली होती. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असतानाच सीबीआयचे पथक लातूरमध्ये दाखल झाले. सीबीआयने शिकवणी वर्ग चालकाची चौकशी सुरू केल्याचे शनिवारी स्पष्ट झाले होते. मात्र, त्या दिवशी आपण विद्यार्थ्यांना शिकवल्याचा दावा मोटेगावकर करत होते. सोमवारी सकाळी मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. पेपरफुटी प्रकरणात अटकेत असणारे लातूरचे प्रा. पी. व्ही कुलकर्णी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि मोटेगावकर हेही रसायनशास्त्र शिकवत. आरोपीबरोबर मोटेगावकरांचे संबंध कसे याचा शोध सीबआयचे अधिकारी घेत होते.

तपासात असे निष्पन्न झाले आहे की, परीक्षेच्या आधीच म्हणजेच २३ एप्रिल २०२६ रोजी मोटेगावकर यांनी नीट युजी परीक्षेचे प्रश्न आणि उत्तरे मिळवली होती. १४ मे रोजी लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या झडतीत, त्यांच्या मोबाईल फोनमध्ये या परीक्षेचे लीक झालेले प्रश्न आढळून आले होते. परीक्षा पार पडल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रश्नपत्रिका डिलीट/नष्ट केल्याचे तपासात समोर आले आहे. ही प्रश्नपत्रिका त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आणि व्यक्तींना पुरवल्याचा संशय आहे. मात्र, ज्या लाभार्थी विद्यार्थ्यांना हे पेपर दिले गेले, त्यांची नावे सांगण्यास मोटेगावकर यांनी सीबीआय अधिकाऱ्यांना टाळाटाळ केली.

हे ही वाचा:

व्हीडी सतीशन यांनी केरळच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

चीनमध्ये ५.३ तीव्रतेचा भूकंप; दोघांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद बॉम्बहल्ला प्रकरणातील दोघांना मुंबईतून अटक

पंतप्रधान मोदींचा ‘रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार – कमांडर ग्रँड क्रॉस’ पुरस्काराने सन्मान

लातूरमध्ये वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यज्ञंचे बॅन्ड लावून कौतुक करण्यापासून ते लातूर पॅटर्नचे फॅक्टरीमध्ये रुपांतर करण्याची जाहिरात मोटेगावकर करत. त्यांना ताब्यात घेतल्याने लातूर पॅटर्नच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागणार आहेत. लातूरमध्ये किमान ३० -३२ शिवकवणीवर्ग सुरू असून त्याचे लाखो रुपयांचे शुल्क असते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा