28 C
Mumbai
Monday, September 7, 2026
घरक्राईमनामापंजाबमध्ये ‘आप’ नेत्याची गोळ्या झाडून हत्या; फिरोजपूरमध्ये खळबळ

पंजाबमध्ये ‘आप’ नेत्याची गोळ्या झाडून हत्या; फिरोजपूरमध्ये खळबळ

आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना

Google News Follow

Related

पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात आम आदमी पक्षाचे नेते गुरप्रीत सिंह उर्फ गोपी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी २९ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे पावणेआठच्या सुमारास मामदोट परिसरात ही थरारक घटना घडली. गुरप्रीत सिंह हे हरप्रीत सिंह उर्फ हॅप्पीसोबत दुचाकीवरून जात असताना कारमधून आलेल्या चार सशस्त्र हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला आणि अचानक गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात गुरप्रीत सिंह गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हल्ल्यात हरप्रीत सिंहही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर मामदोट परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात या हत्येमागे जुन्या निवडणुकीच्या वादाची शक्यता व्यक्त केली जात आहे. फिरोजपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक भूपिंदर सिंह सिद्धू यांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांची ओळख पटली असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची अनेक पथके रवाना करण्यात आली आहेत. मुख्य आरोपीचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहितीही समोर आली आहे.
हे ही वाचा:
कर्मभूमीशी निष्ठा, जन्मभूमीशी नातं!; मोहन भागवतांचा परदेशातील भारतीयांना संदेश

तरुणांच्या प्रश्नांवर भाजपचा फोकस; नितीन नबीन यांची ‘टीम-४५’सोबत चर्चा

एचडीएफसी बँकेला मोठा धक्का; सीईओ शशीधर जगदीशन पदावरून पायउतार होणार

पोलिसांचे चालले आहे काय? उबाठा आमदाराचा ईदचा जुलुस हनुमान मंदिर झाकले |

या गोळीबाराच्या वेळी मामदोट नगरपंचायतीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्की मैनी यांची कारही घटनास्थळी होती. हल्लेखोरांनी त्यांच्या कारलाही लक्ष्य केल्याचे वृत्त आहे; मात्र ते या हल्ल्यातून बचावले. त्यामुळे हा हल्ला नेमका कोणाला लक्ष्य करून करण्यात आला आणि त्यामागे राजकीय वैमनस्य किती कारणीभूत आहे, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका राजकीय नेत्याची अशा प्रकारे हत्या झाल्याने पंजाबमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले असून, या हत्येमागील नेमके कारण आणि कटातील इतर सहभागींचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा