31 C
Mumbai
Tuesday, October 26, 2021
घरक्राईमनामाभोंदू बाबाचा वेष घेत महिलेवर बलात्कार! मुख्य आरोपी यासिन शेख अटकेत

भोंदू बाबाचा वेष घेत महिलेवर बलात्कार! मुख्य आरोपी यासिन शेख अटकेत

Related

नाशिकमध्ये एका महिलेवर घडलेल्या बलात्काराची घटना समोर आली आहे. पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिश दाखवून एका भोंदू इसमाने हा घृणास्पद प्रकार केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात कामील हुलाम यासीन शेख या मुख्य आरोपीने एका भोंदू बाबाचे रूप धारण करत या महिलेला फसवले आहे.

कामील हुलाम यासीन शेख या २९ वर्षीय आरोपीने एका साधूचे सोंग घेत महिलेशी संपर्क साधला. महिलेच्या आर्थिक स्थितीचा गैरफायदा घेत तिला पैशाचा पाऊस पाडायचे अमिश दाखवले. त्यासाठी एक पूजा विधी करावा लागेल अशा थापा यासिन शेखने मारल्या. या विधीसाठी महिलेला नग्न अवस्थेत बसण्यास भाग पाडले. नंतर त्या महिलेवर वारंवार बलात्कार करण्यात आला.

हे ही वाचा:

स्त्रियांनाही मिळणार सैन्यात जाण्याची संधी

दादरच्या कोहिनूरमध्ये करता येणार वाहनांचे चार्जिंग

तालिबानचे ‘उदार’ धोरण एका दिवसात बंद

काबुल विमानतळाची भिंत नवी बर्लिनची भिंत?

नाशिकमधील गंगापूर भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणात गंगापूर पोलिसांनी धडक कारवाई करत भोंदू बाबा बनलेल्या यासिन शेख आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. यासिनचे साथीदारही त्याच्या प्रमाणेच आपली खरी ओळख लपवून वावरत होते. स्टॅलिस्टिंग आणि जेम्स फर्नांडिस असे दोन साथीदार यासिनला मदत करत होते. ते दोघेही शिवराम आणि अशोक भुजबळ अशा दोन खोट्या नावांनी वावरत होते. या दोघांनीही महिलेची फसवणूक करताना यासिनला मदत केली होती.

गेले ६-७ महिने हा प्रकार सुरु होता. त्यानंतर या महिलेने पोलिसांत यासिन शेख आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यासिनचे साथीदार त्याला महिलेवर अत्याचार करण्यासाठी उद्युक्त करत असल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,443अनुयायीअनुकरण करा
4,420सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा