28 C
Mumbai
Monday, February 16, 2026
घरक्राईमनामाअल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी 'नागीन'चा कलाकार अटकेत

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी ‘नागीन’चा कलाकार अटकेत

Google News Follow

Related

वर्षभरानंतर पोलिसांनी केली कारवाई

टेलिव्हिजनवरील मालिका नागीन ३ चा कलाकार पर्ल पुरी याला ५ वर्षाच्या बालकलाकार मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री अंधेरी पश्चिम येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वसईतील वाळीव पोलिसांनी केली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंधेरी पश्चिम येथे राहणारा टेलिव्हिजन कलाकार पर्ल पुरी याने २०१९मध्ये मालिकेच्या सेटवर एका ५ वर्षाच्या बाल कलाकार मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात केली होती.

हे ही वाचा:

मनसुख हिरेनवर विषप्रयोग केला नसल्याचे उघड

फेसबुकने ट्रम्पवर घातली २ वर्षांची बंदी

यशोमती ठाकूर आदित्य ठाकरेंवर का संतापल्या?

ठाकरे सरकार कधीही कोसळेल ते कळणारही नाही

मात्र वर्सोवा पोलिसांनी या तक्रारीवर कारवाई केली नसल्यामुळे पीडित मुलीच्या वडिलांनी पाठपुरावा केल्यानंतर काही दिवसांपूर्वी हा गुन्हा वर्सोवा येथून वसईतील वाळीव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. अखेर वाळीव पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत शुक्रवारी टेलव्हिजन कलाकार पर्ल पुरी याला अंधेरी पश्चिम येथून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २०१९मध्ये मालिकेच्या सेटवर घडली होती, त्यावेळी पीडित मुलीने आईला याबाबत कळवले देखील होते,मात्र आईने दुर्लक्ष केल्यामुळे मुलीने वडिलांना पोटात दुखत असल्याबाबत कळवले. वडील तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले असता तिच्यावर लैगिक अत्याचार झाल्याचे समोर आले होते.

पीडिता ही वर्सोवा येथे राहणारी असल्यामुळे वडिलांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वाळीव पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आल्यानंतर ताबडतोब कारवाई करून पर्ल पुरी याला अटक करण्यात आली असल्याची माहिती वाळीव पोलिसांनी दिली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा