काही महिन्यांपूर्वी बंगळुरुमध्ये अभियंता अतुल सुभाष यांनी पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. यानंतर आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका ३० वर्षीय तंत्रज्ञाने सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. त्याने त्याच्या पत्नीवर आरोप केला आहे की त्याने हे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले आहे.
मृत तंत्रज्ञ हा आग्रा येथील डिफेन्स कॉलनीचा रहिवासी आहे आणि मुंबईतील एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होता. गेल्या वर्षी ३० जानेवारी रोजी त्याचे लग्न झाले होते. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, माफ करा आई आणि बाबा. मी माझ्या पत्नीला कंटाळलो आहे. कृपया कोणीतरी पुरुषांबद्दल बोला, ते खूप एकाकी होतात. बायको मला धमकावते. त्याचा हा व्हिडीओ ६.५७ मिनिटांचा व्हिडिओ २४ फेब्रुवारीचा आहे.
डिफेन्स कॉलनी येथे राहणारा मानव शर्मा हा मुंबईतील टीसीएसमध्ये रिक्रूटमेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. एअरफोर्समधून निवृत्त झालेले वडील नरेंद्र शर्मा म्हणाले की, मुलाचे लग्न ३० जानेवारी २०२४ रोजी बर्हानशी झाले होते. यानंतर सूनही आपल्या मुलाकडे राहण्यासाठी मुंबईला गेली. काही दिवस चांगले गेले, पण त्यानंतर सून रोज भांडू लागली. कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याच्या धमक्या ती देऊ लागली. सून प्रियकरासोबत राहण्याबाबत बोलू लागली. दरम्यान, २३ फेब्रुवारी रोजी सून आणि मुलगा मुंबईहून घरी आले. त्याच दिवशी मानव पत्नीला सोडण्यासाठी माहेरी गेला होता. तेथे मानवला त्याच्या सासरच्या मंडळींनी धमकावले. दुसऱ्या दिवशी (२४ फेब्रुवारी) पहाटे पाच वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आम्ही त्याला लष्करी रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले.
हे ही वाचा :
सरकारी योजनांच्या निधीसाठी काँग्रेसशासित सुखू सरकारने मंदिरांपुढे पसरले हात
तेलुगू भाषेतही आता ‘छावा’ची गर्जना!
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात मदरशात स्फोट; पाच जणांचा मृत्यू
बांगलादेशात शेख मुजीबुर रहमान, इंदिरा गांधी; हसीना शेख यांच्या खुणा पुसण्यास सुरुवात
यापूर्वी, ९ डिसेंबर रोजी एआय अभियंता अतुल सुभाष यांनी बेंगळुरू येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये सुसाईड नोट आणि व्हिडिओ बनवून आत्महत्या केली होती. पत्नीच्या जाचाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले होते. यानंतर अतुलच्या कुटुंबीयांनी पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबीयांवर अतुलला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता.