पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे सेशन कोर्टाने १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान आरोपीची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितले की, आरोपी दत्तात्रय गाडेवर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत ते सर्व चोरीचे आहेत, बलात्काराचे गुन्हे नाहीत. तो सराईत गुन्हेगार नाहीये कारण त्याच्यावरील सर्व गुन्हे सिद्ध झालेले नाहीत.
ते पुढे म्हणाले, ५.४५ च्या दरम्यान घटना घडली, पिडीत तरुणी बचावासाठी ओरडू शकली असती, बचावासाठी काहीही करू शकली असती, मात्र, तिने तसे काही केले नाही. त्यावेळी आय व्हीटनेसही कोणी नव्हता. या प्रकरणी कोर्टाने आरोपी दत्तात्रय गाडेला १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वकिलांनी सांगितले, जे झाले ते दोघांच्या मर्जीने झाले आहे. याबाबत आरोपीला सत्य घटना काय आहे?, असे विचारले असता. आरोपी म्हणाला, गाडीमध्ये सुरवातीला तरुणी चढली त्यानंतर मी चढलो. जे झाले ते दोघांच्या सहमतीने, संमतीने झाले.
हे ही वाचा :
पत्नीच्या जाचाला कंटाळून आग्रा येथील तंत्रज्ञाची आत्महत्या; मृत्युपूर्वी बनवला व्हिडीओ
सरकारी योजनांच्या निधीसाठी काँग्रेसशासित सुखू सरकारने मंदिरांपुढे पसरले हात
कंगना राणौत आणि जावेद अख्तर यांनी ५ वर्षांपासूनचा वाद अखेर मिटविला!
तेलुगू भाषेतही आता ‘छावा’ची गर्जना!
हे सर्व सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. त्यामुळे ही केस रेपच्या श्रेणीमध्ये येत नाही, असे कोर्टापुढे बाजू मांडल्याचे वकिलांनी सांगितले. जर सहमतीने झाले तर आरोपी पळ का काढला? असा प्रश्न विचारला असता. वकील म्हणाले, आरोपी का पळाला याबाबत आमच्याकडे माहिती नाही. आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.