34 C
Mumbai
Saturday, March 15, 2025
घरविशेषकेजरीवाल या जन्मात तरी तिहारमधून बाहेर पडणार नाहीत!

केजरीवाल या जन्मात तरी तिहारमधून बाहेर पडणार नाहीत!

सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रवेश वर्मा यांचा इशारा 

Google News Follow

Related

दिल्ली सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रवेश वर्मा यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल करत मोठा इशारा दिला. अरविंद केजरीवाल यांच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी केली जाईल आणि या जन्मात तरी ते तिहारमधून बाहेर पडणार नाहीत असे वाटते, असे मंत्री प्रवेश वर्मा यांनी म्हटले.

उपराज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान मंत्री प्रवेश वर्मा यांनी केजरीवालांवर निशाणा साधला. ते म्हणाले, दिल्ली हे पूर्ण राज्य नाही पण ते एक महत्त्वाचे राज्य आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीचा विकास करू आणि ते पूर्ण राज्य बनवू. ते लोक (आप) दिल्लीला लंडनसारखे बनवण्याबद्दल बोलत असत. पण त्यांनी काय बांधले? दारूची दुकाने. शाळां बाहेर, मंदिरांबाहेर दारूची दुकाने उभी केली. शीश महालात एक बारही बनवला. एक आलिशान कार्यालय बनवले आहे, तिथे कोणालाही जाऊ दिले जात नव्हते.

अरविंद केजरीवाल यांनी स्वतःच्या पालकांनाही सोडले नाही. त्यांचे वडील चालू शकतात पण तरीही त्यांनी त्यांना मतांसाठी व्हीलचेअरवर बसवले. निवडणुकीच्या २ महिन्यांत केजरीवाल यांनी जातीच्या आधारावर दिल्लीचे विभाजन केले. अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमध्ये अनेक रेशनकार्ड बनवण्यात आले आहेत. जर कोणत्याही बांगलादेशी व्यक्तीचे रेशनकार्ड बनवले असेल तर त्याची चौकशी केली जाईल आणि कारवाई देखील केली जाईल, असे मंत्री वर्मा यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

पत्नीच्या जाचाला कंटाळून आग्रा येथील तंत्रज्ञाची आत्महत्या; मृत्युपूर्वी बनवला व्हिडीओ

सरकारी योजनांच्या निधीसाठी काँग्रेसशासित सुखू सरकारने मंदिरांपुढे पसरले हात

कंगना राणौत आणि जावेद अख्तर यांनी ५ वर्षांपासूनचा वाद अखेर मिटविला!

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची मोदी, बागेश्वर बाबांवर स्तुतीसुमने

ते पुढे म्हणाले, सकाळी विधानभवनात आल्यानंतर माझ्या बेंचखाली एक पेन सापडला, जो (केजरीवाल) आपल्या शर्टवर लावून फिरायचे. याच आसनावर बसत होते, कदाचित विसरले असतील. हे त्यांना परत करा. ते ५ रुपयांचा पेन लावत होते पण त्यांचा राजवाडा पाहिला तर तो दुबईच्या शेखसारखा होता, असा टोलाही मंत्री वर्मा यांनी लगावला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
235,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा