30 C
Mumbai
Saturday, November 15, 2025
घरक्राईमनामादाऊदच्या ड्रग्स नेटवर्कला मोठा हादरा! मुंबईतील 'डॉन'चा विश्वासू युसूफ चिकनाचा मुलगा दानिश...

दाऊदच्या ड्रग्स नेटवर्कला मोठा हादरा! मुंबईतील ‘डॉन’चा विश्वासू युसूफ चिकनाचा मुलगा दानिश मर्चंट गोवा येथून अटकेत

Google News Follow

Related

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या ड्रग्स नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे. दाऊदचा अनेक वर्षांपासूनचा विश्वासू असलेल्या युसूफ चिकना याचा मोठा मुलगा दानिश मर्चंट जो दानिश चिकना या नावाने ओळखला जातो, त्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) नुकतीच गोव्यातून अटक केली आहे. मुंबईतील दाऊदच्या नेटवर्कशी संबंधित ड्रग्जचे मोठे रॅकेट तो चालवत असल्याप्रकरणी एनसीबीच्या रडारवर होता. दानिशच्या या अटकेमुळे दाऊदच्या ड्रग्स नेटवर्कचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई एनसीबीच्या पथकाला दानिशच्या कारवायांची माहिती मिळाल्यानंतर रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. दानिश हा मुंबईतील डोंगरी येथे ड्रग्ज मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवत होता आणि देशाच्या विविध भागांमध्ये ड्रग्जचा पुरवठा करत होता. गोव्यात अटक झाल्यानंतर आता त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात आहे.

दानिश चिकना अनेक वर्षांपासून कायद्याच्या चौकटीत अडकला आहे. डोंगरी येथे त्याचे ड्रग्ज फॅक्टरी युनिट उघडकीस आल्यानंतर त्याला पहिल्यांदा २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याने डोंगरीमध्ये ड्रग्जची तपासणी करण्यासाठी एक प्रयोगशाळा (Laboratory) बनवली होती. या ठिकाणी तो ‘एमडी’ (MD) हा ड्रग्ज तयार करून त्याचा फॉर्म्युला कारखान्यांना पाठवून मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून घेत होता, अशी माहिती समोर आली होती. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.

जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने नव्या मार्गाने आपला बेकायदेशीर व्यवसाय पुन्हा सुरू केला. त्यानंतर, २०२१ मध्ये एनसीबी आणि कोटा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत त्याला राजस्थानमधील कोटा येथे पुन्हा पकडण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी त्याला अटक करण्यापूर्वी सुमारे १२०० किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग केला होता. त्यावेळी त्याच्या गाडीतून सुमारे २०० ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि त्याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अटकांनंतरही, दानिशने आपले संबंध पुन्हा जुळवून आणत ड्रग्जचा व्यापार वाढवणे सुरूच ठेवले होते.

हे ही वाचा : 

‘पिस्टल क्वीन’ राही सरनोबत

भारताचा आर्थिक उत्थान उत्पादन क्षेत्राच्या बळकटीवर अवलंबून

‘द ताज स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

‘सूर्या’ पुन्हा तळपला — १५० षटकारांचं सूर्यमंडळ उजळलं!

एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, भारतातील दाऊद इब्राहिमचे ड्रग्ज नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या त्यांच्या प्रयत्नात दानिशची ही ताजी अटक एक मोठी आणि निर्णायक प्रगती आहे. सध्या एनसीबीकडून दानिशचे ड्रग्ज पुरवठादार , ग्राहक आणि त्याचे सर्व आर्थिक व्यवहार यांची कसून चौकशी केली जात आहे. ही चौकशी सुरू असताना आणखी काही अटकेची शक्यता एनसीबीने वर्तवली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
281,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा