29 C
Mumbai
Thursday, May 19, 2022
घरक्राईमनामाजॅकलिन फर्नांडिसच्या संपत्तीवर ईडीची टाच

जॅकलिन फर्नांडिसच्या संपत्तीवर ईडीची टाच

Related

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने एक मोठी कारवाई करताना जॅकलीन फर्नांडिसशी संबंधित संपत्ती जप्त केली आहे. ईडीने जप्त केलेल्या या संपत्तीचे बाजार मूल्य ७.२७ कोटी इतके आहे. यामध्ये तब्बल ७.१२ कोटी रुपयांचे फिक्स डिपॉझिटही समाविष्ट आहेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून जॅकलीन फर्नांडिस ही ईडीच्या रडारवर होती. घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याच्यासोबतच्या नात्यामुळे जॅकलीन अडचणीत आली आहे. तिची ईडी मार्फत चौकशी करण्यात आली होती. सुकेश चंद्रशेखर कडून जॅकलीनने महागड्या भेटवस्तू स्वीकारल्या होत्या. यामध्ये तब्बल ५.७१ कोटी रुपयांच्या विविध भेटवस्तूंचा समावेश आहे. तर यासोबतच तिच्या कुटुंबीयांनाही महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. यामध्ये महागड्या गाड्या तसेच इतर महागड्या सामानाचा समावेश आहेत. या व्यतिरिक्त १ कोटी ३२ लाख आणि १५ लाख रुपयांचे फंड्सही देण्यात आले.

हे ही वाचा:

अमेरिकेतून कुरिअरमधून आणले २७ किलो मारीजुआणा ड्रग्ज; एकाला अटक

MPSC च्या परीक्षेत सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम; रुपाली माने मुलींमध्ये पहिली

‘इलेक्ट्रिक बस खरेदीच्या निविदेत मुंबई महापालिकेचा घोटाळा’

पतियाळात ‘खलिस्तान मुर्दाबाद’चे नारे देणाऱ्या शिवसेना नेत्याचीच पक्षातून हकालपट्टी

ईडीतील सूत्रांच्या अनुसार जॅकलीन फर्नांडिस या विरोधातील ही फक्त प्राथमिक स्वरूपाची कारवाई आहे. या संपूर्ण प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस आणखीनही गोत्यात येऊ शकते. जॅकलिनची आणखी काही संपत्ती जप्त केली जाऊ शकते. अजून पर्यंत जॅकलीन फर्नांडिस हीला या प्रकरणातील आरोपी बनविण्यात आलेले नाही. पण असे असले तरी देखील अद्याप जॅकलीन फर्नांडिस क्लीन चिट सुद्धा दिलेली नाही. तसेच जॅकलीन फर्नांडिसच्या देशाबाहेर जाण्यावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,973चाहतेआवड दर्शवा
1,889अनुयायीअनुकरण करा
9,340सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा