बांगुर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या पत्नीच्या हत्येच्या प्रकरणात केवळ २ तासांत आरोपी पतीला अटक करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे. आरोपीचे नाव वसीम रफीक शेख (वय २५ वर्षे) असून त्याने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जून रोजी रात्री ९.३० च्या सुमारास वसंतवाडी, गोरेगाव (प.) येथे आरोपी वसीम रफीक शेख याने त्याची पत्नी गौशिया वसीम शेख (वय २५ वर्षे) हिला घरगुती कारणावरून भांडणाच्या दरम्यान गळा दाबून ठार मारले. घटनेची माहिती मिळताच बायूनगर लिंक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फिरोज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास सुरू करण्यात आला.
हे ही वाचा :
कुणालाही जमले नाही, पण आम्ही अमेरिकन तळांना केले लक्ष्य!
फडणवीसांच्या मतदारसंघातील मतदार यादीत ५ महिन्यात ८ टक्क्यांची वाढ!
राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे आमंत्रण, पण उत्तर नाही
माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे निधन
घटनेच्या काही तासांतच आरोपी पती वसीम याला पोलिसांनी गोरेगाव रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढला आणि त्याला ताब्यात घेतले. सध्या आरोपी वसीम रफीक शेख याच्यावर कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कोठडीत ठेवून अधिक तपास केला जात आहे.
