देशविरोधी कारवाया आणि आयएसआय एजंटशी असलेल्या संबंधांप्रकरणात हरियाणामधील ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली. यानंतर या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत असून ज्योती हिने ती नवी दिल्लीमधील पाकिस्तान उच्चायोगातील एका कर्मचाऱ्याच्या नियमित संपर्कात असल्याची कबुली दिली आहे. यानंतर हरियाणाच्या हिसार जिल्हा न्यायालयाने गुरुवार, २२ मे रोजी युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजंट्सना शेअर केल्याबद्दल आणि पाकिस्तानी नागरिकाशी सतत संपर्कात राहिल्याबद्दल ज्योती मल्होत्रा या युट्यूबरला अटक करण्यात आली. तिच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अखेर हिसार जिल्हा न्यायालयाने ज्योती हिला चार दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे. दरम्यान, सीआयडी गुन्हे शाखेचे पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) सार्थक सारंगी म्हणाले की, या प्रकरणातील खुलासे पडताळले जात आहेत. “आम्हाला नुकतीच माहिती मिळाली आहे की, युट्यूबर ज्योती मल्होत्राने पुरीच्या जगन्नाथ मंदिराला भेट दिली होती आणि त्यासंदर्भात एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. तिने चिल्का आणि कोणार्कलाही भेट दिली. ती ओडिशातील एका युट्यूबरच्या संपर्कात होती. ही सर्व माहिती पडताळली जात आहे. ज्योती मल्होत्राच्या संदर्भात हरियाणामधील समकक्षांशी संपर्कात आहोत,” अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुरी पोलिसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. हरियाणा आणि अनेक राज्य, केंद्रीय एजन्सींच्या संपर्कात आहोत.
हे ही वाचा..
पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी
जम्मू- काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
पीरपैंती रेल्वे स्टेशनचे रुपडे बदलले !
पाकिस्तान अस्तित्वात आल्यापासून भारताविरुद्ध कट करतोय
ज्योती मल्होत्राची पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली चौकशी करण्यात आली. तिने दिल्लीत अहसान-उर-रहीम या पाकिस्तानी अधिकाऱ्याला भेटल्याचा आरोप आहे, दोनदा पाकिस्तानला प्रवास केला आणि संवेदनशील माहिती शेअर केली. प्राथमिक चौकशीदरम्यान, ज्योती हिच्ने पोलिसांना सांगितले की, ती २०२३ मध्ये व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली होती आणि तिथे तिची भेट अहसान-उर-रहीम उर्फ दानिश नावाच्या माणसाशी झाली.
