कर्नाटकातील चिक्काबल्लापुरा जिल्ह्यात एका मुस्लिम धर्मगुरूविरुद्ध सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहफूज असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, आरोपी धर्मगुरू हा पीडित मुलीचा नातेवाईक आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
पीडित मुलगी आरोपीच्या घरातून बाहेर पडत असताना रडत होती तेव्हा हा गुन्हा उघडकीस आला. आईने दाखल केलेल्या पोलिस तक्रारीनुसार, ही घटना ३० मे रोजी घडली. आईच्या म्हणण्यानुसार, पीडित मुलगी ही तिची दुसरी मुलगी आहे, जिला आरोपी मेहफूजने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून घरी नेले. पीडित मुलगी चिक्कबल्लापूर टाउनच्या दर्गा मोहल्ला परिसरातील स्थानिक उर्दू शाळेत पहिलीच्या वर्गात शिकते.
तक्रारीत म्हटले, तिची मुलगी ३० मे रोजी संध्याकाळी ६:४५ वाजता घरासमोर खेळत होती. “थोड्या वेळाने, तिला दर्ग्यात जाण्यासाठी बोलावण्यासाठी बाहेर आले. मात्र, ती कुठेही दिसली नाही. आजूबाजूला शोध घेतला तेव्हा मुलगी आमच्या शेजारच्या मेहफूजच्या घराच्या पायऱ्या उतरताना दिसली. यावेळी ती रडत होती, असे आईने तक्रारीत म्हटले.
हे ही वाचा :
१० लाख सबस्क्राइबर्स, ज्योती मल्होत्राशी लिंक; हेरगिरी प्रकरणी आणखी एका युट्यूबरला अटक!
भारताविरोधात ISI चा नवा तळ म्हणजे बांगलादेश
सीडीएस जे काही म्हणाले, ते आधीही सांगण्यात आले होते..
१८ वर्षांची प्रतीक्षा संपली… विराट कोहलीचं स्वप्न अखेर पूर्ण झालं! आरसीबी आयपीएल चॅम्पियन!
याबाबत तिला विचारले असता आरोपीने तिला घरी नेल्याचे सांगितले. यादरम्यान मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मेहफूजला भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या विविध संबंधित कलमांखाली आणि मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित आरोपांखाली अटक केली.
