बोरिवली विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय उपाध्याय यांच्या वाहनाच्या जवळ जाणाऱ्या एका डंपरचालकाविरोधात कारवाईची मागणी आमदारांनी केली आहे. सदर डंपरचालकाकडे योग्य परवाना नव्हता तसेच तो पहिल्यांदाच डंपर चालवत असल्याचे समोर आले, तो नशेत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. पश्चिम द्रूतगती महामार्गावर हा प्रकार घडल्याने त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना अशा बेजबाबदार चालकांचा मनस्ताप सहन करावा लागण्यची शक्यता आहे, असे म्हटले जात आहे.
हे ही वाचा:
तृणमूल काँग्रेसचा नगरसेवक रियाझुद्दीनच्या घरात बॉम्ब फुटला
ममता बॅनर्जी यांनी माफी मागावी
नॅशनल हेराल्ड प्रकरण: राहुल, सोनिया गांधींना १४२ कोटींचा फायदा
संजय उपाध्याय यांनी व्हीडिओच्या माध्यमातून हा गंभीर मुद्दा समोर आणला आहे. सदर चालकाला त्यांनी पकडले आणि त्याची माहिती घेतली. त्यांनी व्हीडिओत म्हटले आहे की, आज माझ्या गाडीच्या मागे एक डंपर चालक वारंवार आपले वाहन जवळ आणत होता आणि जोरात ब्रेक लावत होता. विचारणा केली असता त्याचा दादागिरीचा सूर होता. सदर चालक हा परवाना नसलेला होता आणि डंपरवरील नंबर प्लेट खोडलेली होती. या सर्व गंभीर बाबी समोर आल्या. याच्या मोबाईलमध्ये काल रात्रीचे ड्रग्जच्या पॅकेटचे फोटो सुद्धा सापडले! तो म्हणतो की हा त्याचा डंपर चालवण्याचा पहिलाच दिवस आहे, याआधी तो फक्त छोटी गाडी चालवत होता! असे बेकायदेशीर, अनुभव नसलेले आणि संशयास्पद चालक जर मोठे डंपर्स घेऊन मुंबईच्या हायवेवर फिरत असतील, तर हा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे.
संजय उपाध्याय यांनी अशी मागणी केली आहे की, डंपर चालक व मालकावर त्वरित कडक कारवाई व्हावी आणि मुंबई पोलीस आणि वाहतूक विभाग यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे!
