सोमवारी सकाळी, टिटागड शहरातील पाचव्या मजल्यावर असलेल्या तृणमूल काँग्रेसचा नगरसेवक मोहम्मद रियाझुद्दीनच्या फ्लॅटमध्ये बॉम्बचा स्फोट झाला, ज्यामुळे इमारतीची बाह्य भिंत कोसळली. स्फोटामुळे ढिगारा शेजारच्या झोपडपट्टीवर पडला, टिनच्या छपराचे नुकसान झाले, आणि इतर फ्लॅट्समध्ये भिंतींना भेगा पडल्या. या घटनेनंतर रियाझुद्दीनला अटक करण्यात आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दुपारी नगरसेवक मोहम्मद रियाजुद्दीन याला अटक करण्यात आली, त्यांच्यासोबत आणखी दोन जणही अटकेत आहेत. स्फोटात कोणती स्फोटके वापरली गेली, याची तपासणी फॉरेन्सिक तज्ज्ञ करतील, असे पोलिसांनी सांगितले. रिअल इस्टेट प्रमोटर अनिल गुप्ता यांनी दावा केला की, रियाजुद्दीनने हा फ्लॅट जबरदस्तीने ताब्यात घेतला आणि त्याचे पैसे दिले नाहीत.
रियाजुद्दीनने अटक होण्याआधी म्हटले होते की, ही एक कटकारस्थान आहे. मी कधीही त्या फ्लॅटमध्ये राहत नव्हतो. अनेक लोक तिथे येत-जात होते. दरवाजाही कायम उघडाच असायचा.”
हे ही वाचा:
खर्गेंवर सुधांशू त्रिवेदी का संतापले ?
ज्योती मल्होत्राने तोंड उघडले; पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील व्यक्तीशी होता संपर्क
याबाबत भाजप नेते अर्जुन सिंग यांनी म्हटले की, “रियाजुद्दीनचा जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश (JMB) या दहशतवादी संघटनेशी काही संबंध आहे का, हे तपासावे लागेल. त्यांनी लष्कराच्या गुप्तचर विभागाकडून चौकशीची मागणी केली.
बॉम्बस्फोटाच्या याआधी घडलेल्या घटना
डिसेंबर २०२२: ११ वर्षांच्या मुलाला स्फोटात गंभीर दुखापत झाली होती.
त्याच वर्षी कंकिनारा भागात: ६ वर्षांच्या मुलाचा बॉम्बस्फोटात मृत्यू.
सप्टेंबर २०२२: टिटागड फ्री इंडिया हायस्कूलच्या गच्चीवर बॉम्ब फेकला गेला होता. विद्यार्थ्यांमध्ये भीती पसरली होती.
