28 C
Mumbai
Friday, September 17, 2021
घरक्राईमनामाफेरीवाल्याने सुऱ्याने कापली पालिका सहाय्यक आयुक्तांची तीन बोटे

फेरीवाल्याने सुऱ्याने कापली पालिका सहाय्यक आयुक्तांची तीन बोटे

Related

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे, असे म्हणण्याची वेळ महाराष्ट्रावर आली आहे. ठाण्यात एका फेरीवाल्याने चक्क ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची तीन बोटेच सुऱ्याचा वार करून उडवली. या घटनेमुळे ठाण्यात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे.

ठाणे महापालिका माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या कारवाईसाठी गेल्या असताना अमरजीत यादव या फेरीवाल्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कासावडवली भागातील मार्केट परिसरात घडली. त्यांना वाचविण्यासाठी पुढे आलेला त्यांचा अंगरक्षक ही जखमी झाला आहे.

पिंपळे यांच्या हाताची तीन बोटे तर अंगरक्षक याचे एक बोट हल्ल्यात तुटून हातापासून वेगळी झाली आहेत. त्या दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या हाताची बोटे जोडण्याची शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्या हल्लाखोर फेरीवाला यादव याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली.

महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम, फेरीवाले आणि हातगाड्यांवर सद्यस्थितीत सर्वच प्रभाग समितीमध्ये कारवाई सुरू आहे. त्यानुसार माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त पिंपळे या कासारवडवली भागातील मार्केट परिसरात अनधिकृत तसेच रस्ता किंवा पदपथ अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. कारवाई सांयकाळी ६.३० च्या सुमारास सुरु असतानाच संतप्त झालेल्या यादव या फेरीवाल्याने, रागाच्या भरात पिंपळे यांच्यावर चाकूने हल्ला चढवला. डोक्यावर तो सुऱ्याचा वार करणार तेवढ्याच कल्पिता यांनी हात डोक्यावर ठेवल्याने त्या हल्ल्यात हाताची तीन बोटे दोन बोटे कापली गेली आहेत.

याचदरम्यान त्यांचा अंगरक्षक त्यांना वाचविण्यासाठी पुढे आल्यावर त्याच्याही एक बोटाला दुखापत झाली आहे. त्यानंतर त्या फेरीवाल्याने पोलीस पकडण्यासाठी पुढे येत असल्याचे पाहून तोच चाकू आपल्या गळ्यावर ठेवून त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने अखेर पकडले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तसेच जखमींना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

आता श्रीकृष्णजन्मभूमीवर भव्य मंदिराची प्रतीक्षा

काश्मीरमध्ये श्रीकृष्णजन्माष्टमीचा उत्साह; महाराष्ट्रात मात्र मंदिरे बंद

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची का केली ईडीने चौकशी? वाचा…

मराठी माणसाला एकत्र येऊ द्यायचे नाही, म्हणूनच दहीहंडीला विरोध आहे का?

” या हल्ल्यात सहायक आयुक्त पिंपळे यांच्या हाताची तीन तर त्यांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या अंगरक्षकाच्या हाताचे एक बोट कापले गेले आहे. त्या दोघांच्या हातावर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.”  अशी माहिती मारुती खोडके, उपायुक्त, व जनसंपर्क अधिकारी, ठामपा यांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,408अनुयायीअनुकरण करा
3,030सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा