25 C
Mumbai
Thursday, February 9, 2023
घरक्राईमनामाशिवाजी पार्क परिसर उद्या 'नो-फ्लाय झोन' घोषित

शिवाजी पार्क परिसर उद्या ‘नो-फ्लाय झोन’ घोषित

पोलिसांना हवाई हल्ल्याचा संशय

Google News Follow

Related

‘प्रजासत्ताक दिनाच्या’ पार्श्वभूमीवर  २६ जानेवारी रोजी हवाई हल्ल्याच्या संशयावरून मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क ‘नो-फ्लाय झोन’ म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती ‘मुंबई पोलिसांनी’ दिली आहे. उद्याच्या दिवशी हवाई हल्ला होण्याच्या संशयावरून हा आदेश जारी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी २६ जानेवारीला मोठी परेड असते. यावेळेस राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते. मात्र गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी पार्क मैदानावर हवाई हल्ल्याचा कट शिजत असल्याची माहिती मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत. या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून संपूर्ण परिसराची कसून चौकशी केली जात आहे.

देशभरात उद्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मुंबईसह देशभरात प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी चालू आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सर्व सावधगिरी बाळगली आहे. शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुप्तचर विभागाच्या या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आली आहे. शिवाजी पार्क मैदान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

जाणून घ्या तुमच्या नेत्याला’

भाजपाचे मिशन मुसलमान २०२४

मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट दिले होते, पण…फडणवीस काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे भागम भागचा तिसरा भाग

शिवाजी पार्कवर आज सकाळपासूनच परेडची तयारी मोठ्या प्रमाणात चालू आहे. तसेच खबरदारी म्हणून शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाजी पार्क मैदानाची कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय आज आणि उद्या शिवाजी पार्कवर येणाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाची परेड होत असते.

दरवर्षी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते. यावेळी मुंबईच्या महापौरांसह पालकमंत्री आणि इतर मंत्री तसेच आमदारही उपस्थित असतात. त्यानिमित्ताने दरवर्षी पोलिसांच्या कवायतीही होत असतात. मात्र, यंदा शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.  शिवाजी पार्कात उद्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. यावेळी शिवाजी पार्कात १७ चित्ररथाचे पथसंचलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या खात्यांची माहिती पटवून देणारे हे सर्व चित्ररथ आपण यावेळेस बघणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,906चाहतेआवड दर्शवा
2,003अनुयायीअनुकरण करा
61,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा