कळव्यातील विटावा,मुंब्र्यातील शिळफाटा आणि बायपास येथे एकापाठोपाठ एक असे तीन जणांच्या हत्येच्या घटनेने कळवा मुंब्रा परिसरात एकच खळबळ उडवून दिली होती.
या हत्यांच्या घटनांनी कळवा मुंब्रा हादरले होते. स्थानिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कळवा आणि मुंब्रा पोलिसांनी या तिन्ही हत्येचा २४ तासांत छडा लावून मारेकऱ्याना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही घटना वेगवेगळ्या असून तिन्ही हत्येतील आरोपी आणि कारण देखील वेगवेगळी आहे.
ठाण्यातील कळवा विटावा बस स्टॉपच्या मागे ७ मार्च रोजी कळवा पोलिसांना एका व्यक्तीच्या मृतदेह आढळून आला होता, या व्यक्तीच्या डोक्यात दगडाने प्रहार करून हत्या करण्यात आली होती. कळवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मृतदेहाची ओळख पटवली असता मृत व्यक्तीचे नाव अनिल बेहरा (३५) असे असून तो मूळचा झारखंड राज्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित म्हणून संतोष लाड (४५) याला विटावा येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. वैयक्तिक कारणावरून संतोष लाड याने अनिल बेहरा याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉकने प्रहार करून हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली.
हे ही वाचा:
आयपीएल २०२५ ईशान किशनसाठी सुवर्णसंधी!
कोल्हापुरातील ‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामांतरासाठी पुन्हा एकदा जनआंदोलन!
बलुची नागरिकांना व्हायचंय पाकिस्तानाच्या जोखडातून मुक्त
दुखापतग्रस्त राहुल द्रविड कुबड्या घेऊन रॉयल्सच्या प्रशिक्षण शिबिरात
दुसऱ्या घटनेत मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिळफाटा येथील खान कंपाउंड येथे राहणारा झाकीर मोल्ला (३९) याची ११ मार्च रोजी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ही हत्या अनैतिक सबंधातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.
मुंब्रा पोलिसांनी तात्काळ तपास करून पश्चिम बंगाल येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असणारा मारेकरी अश्रूफुल मोल्ला याला कल्याण रेल्वे स्थानकातुन अटक केली.
दरम्यान मुंब्रा येथे राहणारा मोहम्मद राहुल अजीम राईन (२५) याच्यावर त्याच परिसरात राहणारा सादिक इसाक सय्यद (१९)याने चाकूने हल्ला केला होता. जखमी मोहम्मद राईन याला मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.
मुंब्रा पोलिसांनी याप्रकरणी सादिक इसाक सय्यद याला अटक केली. सादिक हा मोबाईल चोर असून त्याने परिसरातील काही मोबाईल फोन चोरी केले होते. त्यात मृत मोहम्मद राईनचा मोबाईल फोन होता, तो फोन मागण्यासाठी गेलेल्या राईनवर सादिकने चाकूने हल्ला केला होता.