25 C
Mumbai
Thursday, October 10, 2024
घरक्राईमनामाविलेपार्ल्यात दोन अल्पवयीन मुलांना चोर समजून जबर मारहाण

विलेपार्ल्यात दोन अल्पवयीन मुलांना चोर समजून जबर मारहाण

जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Google News Follow

Related

विलेपार्ले येथे चोर समजून नागरिकांनी दोन अल्पवयीन मुलांना निर्वस्त्र करत साखळीने बांधून मारहाण करत याचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत.

विलेपार्ले पश्चिमेकडील नेहरूनगर परिसरात राहात असलेल्या ६० वर्षीय तक्रारदार या कचरा वेचण्याचे काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्या मुलीचे निधन झाले असून तिचे १७ आणि १४ वर्षांच्या मुलांचा तक्रारदार या सांभाळ करतात. २३ सप्टेंबरच्या सायंकाळी परिसरातील नागरिकांनी या दोन्ही मुलांना चोर समजून निर्वस्त्र करुन रात्रभर बांधुन ठेवत मारहाण केली.

‘धर्मनिरपेक्षता ही युरोपियन संकल्पना, भारतात याची गरज नाही’

महिला टी- २० विश्वचषकासाठी पहिल्यांदाच महिला सामनाधिकारी, पंच

दुकानं, हॉटेल्सवर मालकाचे नाव हवेचं; सीसीटीव्हीही बंधनकारक

अमेरिकेतील भारतीय वंशांच्या ज्वेलर्सनी बनविली पंतप्रधानांची ‘हिऱ्यांची प्रतिमा’

नागरिक एवढयावरच थांबले नाहीत. त्यांनी दोन्ही मुलांच्या डोक्यावरचे केस कापले. त्यांना साखळीने हातपाय बांधुन ओढत घेवून जात त्यांना लाथा-बुक्यांनी मारहाण करुन धिंड काढली. तसेच, याचे व्हिडीओ चित्रीकरण करत फेसबुकवर व्हायरल केले.

सुरज पटवा आणि अन्य तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी हे कृत्य केले होते. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर तक्रारदार यांनी जुहू पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा