30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
घरक्राईमनामावेदांत अग्रवालचा आक्षेपार्ह भाषेतला व्हिडीओ व्हायरल; जामीन मिळाल्यावर म्हटलं रॅप साँग

वेदांत अग्रवालचा आक्षेपार्ह भाषेतला व्हिडीओ व्हायरल; जामीन मिळाल्यावर म्हटलं रॅप साँग

कुटुंबीयांनी आणि वकिलांनी व्हिडीओ वेदांतचा नसल्याचा केला दावा

Google News Follow

Related

पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याला बाळ सुधार गृहात पाठविण्यात आलं असून त्याचे वडील विशाल अग्रवाल याला अटक करण्यात आली आहे. वेदांतने गाडीने दोन जणांना चिरडले होते त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर वेदांतला काही वेळातच जामीन मिळाला होता आणि यावरून राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता वेदांत अग्रवाल याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे.

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवाल याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये वेदांत अग्रवाल हा रॅप साँग म्हणत असून तो लोकांना शिव्या देत आहे. तसेच आक्षेपार्ह भाषेत लोकांवर टिपण्णी करताना दिसत आहेत. या रॅप साँगमधून तो हो मी आहे बिल्डरचा पोरगा म्हणून सुटलोय, असं म्हणत त्यानंतर रॅपमधून अत्यंत खालच्या पातळीवर जात शिवीगाळ करत असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियालवर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावर आता संताप व्यक्त केला जात आहे. व्हिडीओमध्ये वेदांत याला त्याने केलेल्या कृत्याचा जराही पश्चाताप नसल्याचे दिसत आहे. अपघात घडल्यावर ज्या रात्री त्याला जामीन मिळाला त्यानंतर त्याने हे रॅप साँग गायलं होतं, असं बोललं जात आहे. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी आणि वकिलांनी हा व्हिडीओ वेदांतचा नसल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

डोंबिवली आगीची परिस्थिती नियंत्रणात, ४ मृत्यू!

हमासने अपहरण केलेल्या इस्रायली महिला सैनिकांवरील अत्याचाराचा नवा व्हीडिओ समोर

पुण्यासारखीच जळगावात घटना, अपघातात चार जणांचा मृत्यू, आरोपी मोकाट!

“काँग्रेसला दिलेलं मत व्यर्थ; सात जन्मातही सत्ता येणार नाही”

पुण्यात रात्रीच्या वेळी हा भीषण अपघात झाला. अपघाताच्या वेळी पोर्शे गाडी ताशी २०० किलोमीटर वेगाने जात होती. आरोपी अल्पवयीन होता शिवाय त्याच्याकडे लायसन्स नव्हते, त्याने गाडी चालवण्याचे प्रशिक्षणही घेतले नव्हते. गाडीचीही नोंदणी झालेली नव्हती. चालकाचे वडील विशाल हे ब्रह्मा रियल्टी नावाची कंपनी चालवतात. आरोपी अल्पवयीन मुलाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती आणि तो पार्टी करून परतत होता. या अपघातानंतर तेथे उपस्थित लोकांनी आरोपीला बेदम मारहाणही केली. आरोपी वडिलांवर आपल्या अल्पवयीन मुलाला पोर्शे चालवण्याची परवानगी दिल्याचा आरोप आहे. त्यांनी आपल्या मुलांना ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवायला दिली हा निष्काळजीपणा आहे. ज्या पबमध्ये अल्पवयीन मुलाला दारू दिली जात होती त्या पबवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वडील आणि पबवरही अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक देखील करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा