30 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरक्राईमनामाफटाका अंगावर फेकल्याने तरुणाचा मृत्यू!

फटाका अंगावर फेकल्याने तरुणाचा मृत्यू!

गाझियाबादमधील घटना

Google News Follow

Related

गाझियाबादमधील एका व्यक्तीच्या अंगावर फटाके फेकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची अजब घटना घडली आहे.या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.आरोपी सध्या फरार असून पोलिसांचे एक पथक त्यांच्या शोधासाठी तयार करण्यात आले आहे.रविवारी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे रविवारी ही घटना घडली.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.व्हिडिओमध्ये आरोपी ४० वर्षीय तरुणाच्या अंगावर फटाके फेकताना दिसत आहे, त्यानंतर पीडित तरुण खाली कोसळल्याचे दिसत आहे.पोलिसांना याची माहिती मिळताच परिसरातील सीसीटीव्ही तपासले.सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलिसांनी त्या व्यक्तीला पकडण्यासाठी एक पथक तयार केले असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

होमस्टेमधील एका महिला कर्मचाऱ्याला दारू पाजून केला सामूहिक बलात्कार!

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी आठ संघ झाले पात्र

हैदराबाद येथील एका निवासी इमारतीला आग, ९ जणांचा मृत्यू!

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या स्थानकाचाही कायापालट

रविवारी रात्री उशिरा गाझियाबादच्या लिंक रोडवर दिवाळीनिमित्त ही घटना घडली.या घटनेचा १८ सेकंदाचा व्हिडीओ आहे, ज्यामध्ये दोन चार लोक आपापसात बोलताना दिसत आहेत.त्यांनतर एक व्यक्ती निघून जाण्यासाठी मागे फिरतो तेव्हा एका व्यक्तीने मजेदार कृत्य म्हणून त्याच्या पाठीवर फटाका फेकतो.त्यानंतर लगेच पीडित जमिनीवर कोसळताना दिसतो.नातू उर्फ ​​अफजल असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर प्रदीप असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी पीडितेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
110,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा