वयाच्या १६व्या वर्षी सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस हे विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणारे पुस्तक लिहिणाऱ्या विवान कारुळकरचा नेहरू विज्ञान केंद्र आणि जेएसएस फाऊंडेशनच्या वतीने रविवारी विशेष सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडणाऱ्या व्यक्तींचा गौरव या माध्यमातून केला जातो. यावर्षी उदयोन्मुख वैज्ञानिक या सन्मानासाठी विवानची निवड करण्यात आली.
विवानची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आल्याची घोषणा नेहरू विज्ञान केंद्र आणि जेएसएसच्या वतीने करण्यात आली होती. ८ जून रविवार या दिवशी हा सत्कार आयोजित करण्यात आला होता. विवानने पुरस्कार स्वीकारला तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे अभिनंदन केले. एवढ्या लहान वयात हे पुस्तक लिहिल्याबद्दल त्याचे उपस्थितांनी कौतुकही केले.
विवान कारुळकर हा प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर तसेच या प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांचा सुपुत्र आहे.
या संस्थांच्या माध्यमातून यादिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. त्याअंतर्गत विज्ञानावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते तसेच पर्यावरण, सामाजिक विषयांवर आधारित कवीसंमेलनाचे आयोजनही केले गेले होते. त्याचवेळी या पुरस्कारविजेत्यांना सन्मानही करण्यात आला. जागितक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हे ही वाचा:
‘राज-उद्धव एकत्र येणार का, यापेक्षा माध्यमांनी जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे….’
केरळ किनाऱ्याजवळ सिंगापूरच्या मालवाहू जहाजात स्फोट, ४ क्रू मेंबर्स बेपत्ता!
HIS STORY OF ITIHAS…डाव्या विचारसरणीचा बुरखा फाडणारा सत्यशोधाचा पट
एसबीआयने सरकारला किती हजार कोटींचे लाभांश दिले?
या पुस्तकासह विवानचे सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल टेक्नॉलॉजीस हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. ही पुस्तके मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेतही प्रकाशित झालेली आहेत. सर्व स्तरावर या पुस्तकांचे कौतुक होत असून देशविदेशातही विविध मान्यवरांनी वेळोवेळी विवानच्या पाठीवर शाबासकीची थाप दिलेली आहे.
भारतातही त्याच्या पुस्तकांचे विविध स्तरावर कौतुक झालेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या पुस्तकाचे कौतुक केले असून प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतील मंदिरातही प्रभू श्रीरामचरणी या पुस्तकाची प्रत ठेवण्यात आली होती. श्रीराम मंदिर ट्रस्टचे चंपतराय यांनीही पुस्तकाची स्तुती केली होती.
