सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पानोली यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करणाऱ्या वजाहत खानला कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी वजाहतवर धार्मिक भावना भडकवण्याचा आणि द्वेष पसरवण्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वजाहत खान १ जूनपासून फरार होता आणि पोलिसांनी तीनदा नोटीस देऊनही तो हजर राहिला नाही. यानंतर पोलिसांनी कोलकाता येथील गार्डन रीच परिसरातील त्याच्या घरावर अनेक वेळा छापे टाकले आणि अखेर त्याला अटक केली.
आरोपी वजाहतविरुद्ध गोल्फ ग्रीन पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. सोशल मिडीयावर त्याने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये हिंदू धर्म, देवता आणि परंपरांविरुद्ध अपमानास्पद, उत्तेजक आणि अश्लील भाषा वापरली गेली होती. ‘श्री राम स्वाभिमान परिषद’ नावाच्या संघटनेने २ जून रोजी वजाहतविरुद्ध औपचारिक तक्रारही दाखल केली होती.
यापूर्वी, शर्मिष्ठा पानोली यांना ३० मे रोजी कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली होती. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’वर मौन बाळगल्याबद्दल काही मुस्लिम बॉलिवूड स्टार्सवर नाराजी व्यक्त केली होती. व्हिडिओमध्ये वापरलेली भाषा जातीय आणि आक्षेपार्ह असल्याचे वर्णन करण्यात आले होते. दरम्यान, अटकेनंतर पानोली यांनी व्हिडिओ डिलीट केला आणि माफीही मागितली.
हे ही वाचा :
साप-मुंगूसाच्या हाणामारीत चिलटाची मध्यस्थी
विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कांदिवलीतील भाजपाचे कार्यकर्ते सज्ज!
‘राज-उद्धव एकत्र येणार का, यापेक्षा माध्यमांनी जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे….’
मुस्लिम तरुणाने २३ हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले! म्हणाला, लक्ष्य ५० होते!
दुसरीकडे, न्यायालयाने आता पानोलीला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामिनाच्या अटींनुसार, त्या देश सोडून जाऊ शकत नाहीत आणि त्यांना न्यायालयात १०,००० रुपयांची रक्कम जमा करावी लागली. न्यायालयाने म्हटले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे निरपेक्ष नाही आणि त्याचा वापर कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्यासाठी केला जाऊ शकत नाही.
