29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरसंपादकीयजितेंद्र आव्हाड हेच करमुसे अपहरण प्रकरणाचे सूत्रधार

जितेंद्र आव्हाड हेच करमुसे अपहरण प्रकरणाचे सूत्रधार

महाविकास आघाडीची सत्ता असताना काही नेते इतके मस्तवाल झाले होते की सर्वसामान्य जनता ही किडामुंगी असल्याप्रमाणे त्यांचे वर्तन सुरू होते.

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आता कायद्याच्या फास आवळत चालला आहे. अनंत करमुसे मारहाण आणि अपहरण प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या चौथ्या आरोपपत्रातून जितेंद्र आव्हाड हेच याप्रकरणाचे सूत्रधार होते, हे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे आव्हाड या प्रकरणात तुरुंगात जाणार ही बाब निश्चित झालेली आहे.

एखादा सामान्य माणूस कायद्याची मशाल घेऊन लढायला लागला तर भल्याभल्यांना पळताभुई थोडी होते. करमुसे प्रकरणात हे सत्य ठसठशीतपणे समोर आले आहे. महाविकास आघाडीची सत्ता असताना काही नेते इतके मस्तवाल झाले होते की सर्वसामान्य जनता ही किडामुंगी असल्याप्रमाणे त्यांचे वर्तन सुरू होते. कोणालाही उचलायचे, मारहाण करायची, कोणाच्याही घरात घुसायचे असा मामला होता. आव्हाडांसारखे मंत्री या कृत्यांमध्ये मागे नव्हते. त्यामुळे अनंत करमुसे यांना एका फेसबुस पोस्टमुळे इतक्या यमयातना भोगाव्या लागल्या.

हे ही वाचा:

फेस-स्वॅपिंग तंत्रज्ञानाच्या आधारे मित्र असल्याची बतावणी करत लुटले पाच कोटी

एक्स्प्रेस वेवर १७ महिन्यांत ३५ वाहनांना आग

बेशिस्त चालकांची आता धडगत नाही; आरटीओ इंटरसेप्टरची संख्या होणार पाचपट

जितेंद्र आव्हाडांविरोधात चौथे आरोपपत्र, करमुसे मारहाण प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा दावा

त्यांच्या घरात गुंड पाठवले गेले, बंगल्यावर आणून त्यांना बेदम मारहाण झाली. त्यांच्या पत्नीला धमकावण्यात आले. हा होता छळवणुकीचा एक टप्पा. पुढे पोलिस यंत्रणांना हाताशी धरू त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी मारहाण आणि अपहरण प्रकरणात तक्रार केल्यानंतर झालेला तपास दबावाखाली होता. आव्हाडांचे नाव एफआयआरमध्ये दाखल करण्यासाठी करमुसेंना कोर्टबाजी करावी लागली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत करमुसे यांनी दिलेला लढा त्यांच्या जिगरबाज मनोवृत्तीची साक्ष देणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणात फेरतपास करून पोलिसांना अहवाल सादर करण्याचा इशारा दिला होता. नव्याने झालेल्या तपासात करमुसे यांना न्याय मिळेल आणि आव्हाडांना दणका अशी शक्यता निर्माण झाली आहे.

करमुसे प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या चौथ्या आरोपपत्रात आव्हाड यांचा या प्रकरणात मुख्य सहभाग होता. ते या कटाचे सूत्रधार होते ही बाब स्पष्ट झालेली आहे. आधी दाखल करण्यात आलेल्या तीन आरोपपत्रात एका ऑडीयो क्लीपमुळे त्यांचे नाव आरोपपत्रात आले. परंतु गुन्ह्यातील त्यांची भूमिका पोलिसांनी स्पष्ट केलेली नव्हती. त्यांना निसटून जाण्यासाठी वाव होता.

 

आता पोलिसांनी १२० ब आणि ३६४ अ ही दोन नवी कलम जोडली आहे. पहिल्या कलमाचा अर्थ गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणे, दुसऱ्या कलमाचा अर्थ अपहरण, जबरी मारहाण अशा प्रकारचा आहे. म्हणजे आव्हाड या प्रकरणाचे सूत्रधार आहेत ही बाब नव्या आरोपपत्रातून उघड होते. पूर्वीच्या आरोपपत्रात आरोपी म्हणून अस्पष्ट दिसणारा आव्हाडांचा चेहरा आता व्यवस्थित समोर आला आहे.

नव्या आरोप पत्रात आणखी बराच मसाला आहे. मारहाण प्रकरणात सहभागी असलेले दोन प्रत्यक्षदर्शी माफीचे साक्षीदार बनल्यामुळे आव्हाडांचे कठीण झाले आहे. दोन पोलिस अधिकाऱ्यांची नावे यात आरोपी म्हणून नव्याने सामील झाली आहे. हो दोन्ही अधिकारी अपहरण नाट्यात सामील होते. पूर्वीच्या तपास अधिकाऱ्यांनी याप्रकरणात राजकीय दबावातून घोळ घातला होता. आव्हाडांना याप्रकरणात वाचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनाही कसूरी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. त्यांच्याकडून मागवलेला खुलासा समाधानकारक नसेल तर त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

अनेक नवे पुरावे समोर आले आहेत. अपहरणासाठी पोलिसांच्या जीपसोबत एक करड्या रंगाची इनोव्हा वापरण्यात आली होती. करमुसे सुरूवातीपासून या गाडीबाबत सांगत होते. परंतु पोलिसांनी फार लक्ष दिले नाही. ही इनोव्हा सरकारी असून म्हाडाची असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी ही इनोव्हा जप्त केली आहे. या इनोव्हाच्या चालकाचा पोलिसांनी पुन्हा जबाब घेतला असून यापूर्वी त्याने दिलेला जबाब पोलिसांच्या दबावाखाली होता ही बाब स्पष्ट झाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे करमुसे यांचे अपहरण करताना आव्हाड यांच्यासह आरोपींची जी काही फोनाफोनी झाली. त्या सर्व कॉलचे लोकेशन पोलिसांनी काढले असून त्यांचा सविस्तर अहवाल तयार केला आहे.

हे काही महिन्यांपूर्वी व्हायला हवे होते. परंतु तेव्हा कायदा सत्ताधाऱ्यांच्या कचाट्यात होता. पोलिस त्यांचे ताबेदार असल्यासारखे वागत होते. त्यामुळेच करमुसे प्रकरण घडले. त्यानंतर आव्हाडांचा आत्मविश्वास इतका वाढला की त्यांचा माज प्रचंड वाढला. ते अधिकाधिक बेताल वक्तव्य करत होते. अलिकडे ठाण्यात निघालेल्या मविआच्या एका आक्रोश मोर्चात त्यांनी करमुसे प्रकरणात गाजवलेल्या पराक्रमाची कबुली दिली होती. सतत कायदा हाती घेणाऱ्या या माणसावर सरकार कारवाई का करत नाही याबाबत लोकांमध्ये उघड चर्चा होती. परंतु आता काळ्यावर पांढरे झाले आहे. आव्हाडांचा याप्रकरणातला सहभाग स्पष्ट झाला आहे.

या प्रकरणात आव्हाडांची मदत करणारे त्यांना सहभागी असणारे सुद्धा याप्रकरणात त्यांच्यासोबत अडकणार आहेत. काही पोलिस अधिकाऱ्यांचा यात समावेश असावा ही शरमेची बाब. याप्रकरणात सहभागी असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलने आत्महत्या केलेली आहे. हे पाप सुद्धा आव्हाड यांच्या शिरावर आहे. हा मस्तवाल नेता लवकर गजाआड व्हावा, त्याला कायद्याची जरब बसावी ही तमाम जनतेची इच्छा आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा