26 C
Mumbai
Tuesday, December 10, 2024
घरसंपादकीयमुस्लिम मते जिथे जिथे, उबाठाचा विजय तिथे तिथे!

मुस्लिम मते जिथे जिथे, उबाठाचा विजय तिथे तिथे!

उबाठाला आता या मुस्लीमांच्या मीठाला जागावे लागेल.

Google News Follow

Related

हिंदू संघटन हेच ध्येय घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना गेली शंभर वर्षे काम करते आहे. गेल्या शंभर वर्षात रा.स्व.संघाने एकही निवडणूक लढवलेली नाही. तरीही देश पातळीवर, महाराष्ट्र पातळीवर काँग्रेसच्या जातकुळीतील पक्ष
संघाला टार्गेट करत राहिले. कधी काळी शिवसेनेशी संघाचे प्रेमाचे संबंध होते. शिवसेनाप्रमुखांनी तर कधी काळी संघाच्या मुख्यालयातही भेट दिली होती. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी सोयरीक जमवल्यापासून हे संबंध बिघडायला सुरूवात झाली. काँग्रेस संघाला टार्गेट करते आहे, हे पाहून ठाकरेंनीही तोच कित्ता गिरवायला सुरूवात केली. संघावर टिकेच्या शेणगोळ्यांचा मारा करताना त्यांच्या डोळ्यासमोर मुस्लिम मतांचे लोणी होते. परंतु हे लोणी तोंडात पाडून घेताना
ठाकरेंनी जे काही गमावले ते मोजताही येणार नाही.

महाराष्ट्रात महायुतीची जी त्सुनामी आली, त्या मागे संघ आहे ही बाब आता पुरेशी उघड झाली आहे. संघाने घराघरात जाऊन विषारी प्रचार केला अशी उघड टीका संजय राऊत यांनी केलेलीच आहे. संघावर टीका करून ही त्सुनामी
मविआच्या नेत्यांनी ओढवून घेतलेली आहे. काँग्रेसला संघाची वाटणारी भीती नेहरुंपासूनची आहे. ती गांधी घराण्याने वारसा
म्हणून स्वीकारलेली दिसते. अलिकडेच राहुल गांधी अमेरिकेत जाऊन संघाबाबत गरळ ओकून आले. ‘देशात लढाई राजकीय नाही, प्रश्न हा आहे की शिखाला पगडी घालण्याचा, कडा घालण्याचा, गुरुद्वारामध्ये जाण्याचा अधिकार आहे का?
देशात रा.स्व.संघाचे लोक एका राज्यापेक्षा दुसऱ्या राज्याला हीन समजतात, एका भाषेपेक्षा दुसऱ्या भाषेला, एका धर्मा पेक्षा दुसऱ्या धर्माला आणि एका समाजापेक्षा दुसऱ्या समाजाला हीन समजतात. आरएसएस तोडने का काम करती है,
आरएसएस नफरत फैलाती है… हे तर राहुल गांधी यांचे पालुपद आहे. जी लढाई काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी होती. ती राहुल गांधी यांनी काँग्रेस विरुद्ध आरएसएस अशी करून घेतली.

आता मालकाने अशी भाषा सुरू केल्यानंतर चेले चपाटे. संघाविरुद्ध बोलणारच. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले राजकीय दृष्ट्या संघ हा खतरनाक आहे. हा विषारी साप आहे, त्याला ठार केलेच पाहिजे. हुसेन दलवाई म्हणाले,
संघ ही दहशतवादी संघटना आहे. काँग्रेसचे नेते इतके विखारी बोल बोलत असताना १० जनपथच्या दारावर उभे असलेले उद्धव ठाकरे मागे कसे राहतील? ते एक पाऊल पुढे गेले. त्यांनी थेट सरसंघचालक मोहनराव भागवत यांना सवाल विचारायला, त्यांच्यावर टीका करायला सुरूवात केली. ‘माझ्या हिंदुत्वाबाबत बोलता, मग भागवत मशिदीत जातात ते चालते काय?’ असे आचरट प्रश्न ठाकरे विचारू लागले. आपली उंची किती भागवतांची उंची किती याचे भानही त्यांना राहिले नाही.
संजय राऊत म्हणाले, ‘संघाचे स्वातंत्र्य लढ्यातले योगदान टिंबा येवढेही नाही.’

हे ही वाचा:

संसदेतील कार्यक्रमात काँग्रेसच्या राजकुमारांचा अहंकार दिसला

नवी मुंबईत १८ चाकी ट्रेलर चोरीला

इस्लामाबाद बनले रेड झोन, आंदोलकांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश!

सरकारविरोधी भूमिका घेतल्याने काँग्रेस आमदारावर कारवाई

तोरा असा होता की, राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी महात्मा गांधींच्या मीठाच्या सत्याग्रहात सहभाग घेतला होता. काकोरी कटात सजा भोगली होती. ज्यांनी आयुष्यभर फक्त झोलझपाटे करून पैसा कमावला अशी मंडळी, तन मन धन अर्पण करून देशसेवा करणाऱ्या संघाच्या नावाने बोटं मोडत होती. हे सगळे राहुल गांधी यांची री ओढण्यासाठी सुरू नव्हते. त्यामागे मुस्लीम मतांचे गणितही होते. हिंदुत्वासाठी काम करणारी हिंदुंची सर्वात मोठी संघटना असलेल्या संघाला आपण झोडतोय, हे मुस्लिमांना दाखवण्याचा प्रयत्न या टिकेमागे होता.  विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर ही रणनीती पूर्णपणे फ्लॉप ठरली असे म्हणता येणार नाही. उबाठा शिवसेनेचे जे २० आमदार विजयी झाले आहेत, त्या मागे अल्पसंख्यांक मतांचा वाटा मोठा आहे. जिथे अल्पसंख्यकांची मते ८ ते ४५ आहे तिथे उबाठाचे उमेदवार विजयी झाले आहेत. अनेक ठिकाणी उबाठाच्या हिंदू उमेदवारांनी इतर पक्षाच्या मुस्लीम उमेदवारांना धूळ चारलेली आहे. मुस्लीम
उबाठा शिवसेनेच्या प्रचारातही ताकदीने उतरले होते. त्यामुळे त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये भगव्यापेक्षा हिरवे झेंडे जास्त असत. सुनील प्रभू यांच्यासारख्या अनेक उमेदवारांनी मुस्लिमांच्या सोबत बंद दारा आड बैठका घेतल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

उबाठाचे जवळपास सर्व उमेदवार मुस्लीम मतांमुळे विजयी झालेले आहेत. वर्सोव्यात मुस्लीमांची टक्केवारी ३३, उबाठाचे विजयी उमेदवार हरून खान, कलीना २४ टक्के, विजयी उमेदवार संजय पोतनीस, वांद्रे पूर्व मुस्लीम ३३.१० टक्के, विजयी उमेदवार वरुण सरदेसाई, माहीम मुस्लीम मतं १३.२० टक्के, विजयी उमेदवार महेश सावंत, दिंडोशीत मुस्लीम मतांचा टक्का ११.९, विजयी उमेदवार सुनील प्रभू. भायखळा मुस्लीम मतांची टक्केवारी ४१, विजयी उमेदवार मनोज जामसुतकर, जोगेश्वरीत मुस्लीम मतं १४.४ टक्के, बाळा नर विजयी, धाराशीव मुस्लीम मतं १२ टक्के, विजयी उमेदवार कैलास पाटील, परभणी मुस्लीम मतदार ४१ टक्के, विजयी उमेदवार डॉ.राहुल पाटील, गुहागर ८ भास्कर जाधव, शिवडी ८ अजय चौधरी, दर्यापूर १२.४ टक्के, मेहकर ३१ टक्के, बार्शी ८.२ टक्के.

मुस्लीमांनी वांद्रे पूर्व सारख्या मतदार संघात झिशान सिद्दीकी सारख्या उमेदवाराला नाकारून वरुण सरदेसाई यांना पसंती दिली. अलिकडेच बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यामुळे झिशान यांना सहानुभूती अपेक्षित होती. परंतु उद्धव ठाकरे यांचे मुस्लीम मतांवर गारुड असे जबरदस्त आहे की वरुण सरदेसाई इथून विजयी झाले. मविआ व्यतिरीक्त कोणालाही मतदान करू नका, असे आवाहन मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचा सज्जाद नोमानी याने केले होते. ते शंभर टक्के अंमलात आले आहे.
संघाला टीकेचे लक्ष्य बनवून ठाकरेंनी ही कमाई केली. एकनाथ शिंदे सोडून गेल्यानंतर त्यांच्याकडे जेमतेम १४ आमदार शिल्लक होते. त्यापेक्षा जास्त आमदार त्यांनी निवडून आणले. परंतु ही परंपरागत काँग्रेसची मतं आहेत. ठाकरे जोपर्यंत राहुल गांधी यांच्या छत्रछायेत राहतात तोपर्यंत ही मतं कदाचित त्यांच्यासोबत राहतील. परंतु विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उबाठा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जी काही जुतम् पैजार सुरू आहे ते पाहाता हे किती काळ सोबत राहतील हे सांगता येणार नाही.

वोट जिहादचे सिपहसालार बनवण्याच्या नादात ठाकरेंनी संघावर केलेली टीका आणि एकूणच हिंदुत्वाच्या विरोधात उपसलेली तलवार लक्षात घेऊन हिंदू मतदार मात्र त्यांच्यापासून दुरावला आहे. जिथे मुस्लीम मतांचा टक्का आठ किंवा
त्यापेक्षा पुढे आहे तिथे त्यांना विजय मिळाल्याचे स्पष्ट दिसते आहे. बाकी मतदार संघात त्यांचा बाजार उठलेला आहे. उबाठाला आता या मुस्लीमांच्या मीठाला जागावे लागेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
211,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा