31.5 C
Mumbai
Wednesday, March 3, 2021
घर देश दुनिया 'ब्रिक्स' साठी चीनचा भारताला पाठिंबा

‘ब्रिक्स’ साठी चीनचा भारताला पाठिंबा

Related

भारत आणि चीन या दोन देशांचे संबंध अत्यंत तणावपूर्ण असताना गेल्याच आठवड्यात दोन्ही सैन्यांनी ‘डिसएंगेजमेंट’चा करार केला. यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेल्या दोन्ही सैन्यांना माघारी येता आले आहे. आता चीनने भारताला ‘ब्रिक्स’ परिषदेचे आयोजन करण्यासाठी पाठिंबा दिला आहे. या परिषेदयेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग हे भारतात येण्याचीही शक्यता आहे.

ब्रिक्स ही हे आंतरराष्ट्रीय संघटना आहे. यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश समाविष्ट आहेत. या देशांच्या इंग्रजी नावांच्या पहिल्या अक्षरापासून BRICS हा शब्द तयार होतो त्यामुळे या देशांच्या संघटनेला ब्रिक्स हे नाव देण्यात आले आहे. २००१ मध्ये पाहिल्यान्दा ब्रिक ही संकल्पना उदयास आली. यामध्ये दक्षिण आफ्रिका वगळता उर्वरित देश सामील होते. हे देश आणि या देशांच्या अर्थव्यवस्था युरोपिअन युनियन प्रमाणे वाढू शकतील या अपेक्षेने ब्रिक समुहांची स्थापना झाली होती. २०१० मध्ये यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाला आणि ब्रिक समूह हा ब्रिक्स समूह झाला.

हे ही वाचा:

मोदींच्या दणक्यामुळे चीनचा काढता पाय

भारत आणि चीन दरम्यान मे २०२० मध्ये झालेल्या गलवान खोऱ्यातील हिंसेनंतर दोन देशांमधील संबंध रसातळाला गेले होते. परंतु आता भारत आणि चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर करार केल्यामुळे दोन देशांमधील सैन्य तणाव काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. शिवाय भारताने ब्रिक्स देशांचे आयोजन करण्याला चीनने पाठिंबा दर्शवल्याने हे संबंध अजून काही प्रमाणात सुधारण्याची आशा आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,272चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
707सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा