27 C
Mumbai
Saturday, February 14, 2026
घरदेश दुनियापाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूर! 300 हून अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू

पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूर! 300 हून अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू

Google News Follow

Related

पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने स्थिती आणखीनच वाईट झाली आहे गेल्या केवळ 48 तासांत 320 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अनेक जिल्ह्यांत पूराने थैमान घातले आहे. यामध्ये रस्ते, पूल, इमारती, तसेच विद्युत यंत्रणा पूर्णतः ध्वस्त झाल्या आहेत.

बुनर जिल्ह्यात सर्वाधिक 91 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर स्वातमध्ये 26 घरे, तीन शाळा आणि आठ इतर सार्वजनिक इमारती कोसळल्या आहेत.

अधिक माहिती अशी की, खैबर पख्तुनख्वा राज्यात सुरू असलेल्या बचाव कार्यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी पाठवलेले हेलिकॉप्टर कोसळले आणि त्यात दोन वैमानिकांसह पाच जणांचा मृत्यू झाला. सुमारे 60 हून अधिक जण या घटनेत जखमी झाले असून, अनेकजण अद्याप बेपत्ता आहेत.

प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या माहितीनुसार, स्वात जिल्ह्यात 7 घरे पूर्णपणे नष्ट झाली असून 38 घरे मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाली आहेत. याशिवाय, तीन शाळा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या असून आणखी तीन शाळांना मोठे नुकसान झाले आहे.

गिलगिट-बाल्टिस्तान भागात 5 जणांचा व पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. हे भाग देखील जोरदार पावसाने बाधित झाले आहेत.

दुर्गम भागांत मदत पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. मात्र, खराब हवामान व तुटलेले रस्ते यामुळे मदतकार्य खंडित होत आहे. रेस्क्यू टीमचे प्रवक्ते मोहम्मद सुहेल यांनी सांगितले की, आतापर्यंत 157 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, 100 हून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मात्र, संचार सुविधा ठप्प असल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

खैबर सरकारने पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी 50 कोटी पाकिस्तानी रुपये मदतीचा निधी जाहीर केला आहे. दरम्यान, 21 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

खैबर पख्तुनख्वा राज्यातील पूरग्रस्त भागात मृतदेह खुले मैदानात ठेवण्यात आले असून, तिथे सार्वजनिक प्रार्थनेनंतर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

गुरुवारपासून सुरू झालेल्या पुरामुळे पाकिस्तानमधील बुनेर, बाजौर आणि बट्टाग्रामसह अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहाकार माजला आहे. स्वात, बुनेर, बाजौर, तोरघर, मानसेहरा, शांगला आणि बट्टाग्राम हे जिल्हे पाऊस आणि पुरामुळे सर्वांधिक बाधित आहेत. त्यामुळे, हा भाग आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा