काश्मीरचा प्रश्न हा भारताची अंतर्गत बाब असल्याचे वारंवार खडसावूनही पाकिस्तानकडून सातत्याने काश्मीर मुद्द्यावर टिपण्णी केली जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारत लोकशाही दडपून टाकत आहे आणि मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे असा आरोप पाकिस्तानने केला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर या आरोपाला भारताने कठोर शब्दात उत्तर पाकिस्तानला जबरदस्त सुनावले आहे.
बुधवारी जिनेव्हा येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (UNHRC) बैठकीत भारताने पाकिस्तानला जोरदार फटकारत पाकिस्तान स्वतः मानवी हक्कांचे उल्लंघन करत असून इतरांना उपदेश देण्यासाठी योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच भारताने पाकिस्तानचे वर्णन आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून असलेले अपयशी राज्य असे केले आहे यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पटलावर चांगलीच नाचक्की झाली आहे.
यूएनएचआरसीच्या ५८ व्या सत्राच्या बैठकीत भारताने गुरुवारी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्रांमधील भारतीय राजदूत क्षितिज त्यागी यांनी पाकिस्तानी नेतृत्वावर त्यांच्या सैन्याच्या इशाऱ्यावर खोटे पसरवल्याचा आरोप केला. जम्मू आणि काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याच्या पाकिस्तानी कायदा मंत्री आझम नझीर तरार यांच्या आरोपांना उत्तर देताना त्यागी यांचे हे विधान केले.
क्षितिज त्यागी म्हणाले की, पाकिस्तान हा एक अपयशी देश असून स्वतःला चालवण्यासाठी हा देश आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून आहे. पाकिस्तान काश्मीर आणि भारताबद्दल सतत खोटेपणा पसरवत आहे हे पाहून दुःख होते. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा गैरवापर करून भारतविरोधी वक्तव्ये करत आहे, देशांतर्गत संकटे सोडवण्यात मात्र अपयशी ठरला आहे. पुढे क्षितिज त्यागी यांनी पुनरुच्चार केला की, जम्मू- काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि राहतील. पाकिस्तानच्या अशांततेच्या दाव्यांच्या उलट, अलिकडच्या वर्षांत या प्रदेशांमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण विकास आणि स्थिरतेकडे त्यांनी लक्ष वेधले.
हे ही वाचा :
महाकुंभाची महाशिवरात्रीच्या अमृत स्नानाने समाप्ती, ६६ कोटींहून अधिक भाविकांचे संगमात स्नान!
शशी थरूर म्हणाले, महादेवाच्या भाळावरील चंद्रकोरीवरून ‘शशी’ नाव ठेवले!
राहुल गांधी, उद्धव ठाकरे महाकुंभला गेले नाहीत, त्यांच्यावर बहिष्कार टाका!
महाकुंभ मेळ्याच्या समारोप संध्येला प्रयागराजमध्ये सुखोई विमानांकडून कसरती
“पाकिस्तानने आपल्या लोकांना खऱ्या अर्थाने शासन आणि न्याय देण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. अस्थिरतेवर भरभराट करणारे आणि आंतरराष्ट्रीय मदतीवर टिकणारे अपयशी राज्य या परिषदेचा वेळ वाया घालवत आहे हे दुर्दैवी आहे. त्यांचे भाषण ढोंगीपणा, अमानुषता आणि अक्षमतेने भरलेले प्रशासन यांनी भरलेले आहे. भारताचे लक्ष आपल्या लोकांसाठी लोकशाही, प्रगती आणि प्रतिष्ठा सुनिश्चित करण्यावर आहे,” असं स्पष्ट मत क्षितीज त्यागी यांनी व्यक्त केले आहे.