२४ तासांच्या आत भारतात पुन्हा एकदा पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. एक दिवसापूर्वी अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींचे सोशल मीडिया हँडल भारतात दिसू लागले होते, त्यानंतर सरकारने कारवाई करत ते ब्लॉक करून टाकले आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी सेलिब्रिटी, क्रिकेटपटू आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचे यूट्यूब चॅनेल, इंस्टाग्राम आणि फेसबुक आयडी आणि एक्स अकाउंट्स लॉक केले होते.
बुधवारी (२ जुलै) भारतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल आणि इंस्टाग्राम अकाउंट्स पुन्हा दिसू लागल्यापासून ही कारवाई करण्यात आली आहे. सबा कमर, मावरा होकेन, फवाद खान, शाहिद आफ्रिदी, अहद रझा मीर, यमना जैदी आणि दानिश तैमूर यासारख्या अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींची इंस्टाग्राम अकाउंट भारतीय वापरकर्त्यांसाठी पुन्हा दिसू लागली. याव्यतिरिक्त, हम टीव्ही, एआरवाय डिजिटल आणि हर पल जिओ सारखे पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल देखील पुन्हा उपलब्ध झाले होते, मात्र आता ते बंद करण्यात आले आहेत.
हे ही वाचा :
“नक्षलग्रस्त” गडचिरोली राष्ट्रसेवेच्या मार्गावर
कलाम यांच्या गौरवार्थ नामकरण केलेले K-6 करणार कमाल
कार्यकर्त्यांसोबत मिळून आपण पक्ष संघटनेला अधिक उंचीवर नेऊ: हेमंत खंडेलवाल
‘सितारे जमीन पर’ चित्रपट पाहून फडणवीसांनी केले अमीर खानचे कौतुक
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे ही खाती रिफ्लेक्ट होत आहेत. “जर तुम्हाला X, YouTube आणि Meta वर काही खाती दिसली तर काही तासांत ती उपलब्ध होणार नाहीत. काही तांत्रिक बिघाडामुळे अनब्लॉक करण्यात आले. आता ते दुरुस्त केले आहे,” असा दावा सरकारी सूत्रांनी केला. उल्लेखनीय म्हणजे, बंदी असूनही, भारतात पाकिस्तानी चॅनेल आणि सेलिब्रिटी अकाउंट्स पुन्हा दिसणे आणि नंतर गायब होणे यावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
