अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवार, ४ जानेवारी (स्थानिक वेळेनुसार) अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा संबोधित केले. भाषणाची सुरुवात करताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका परत आली आहे. आपल्या भाषणात त्यांनी चीन आणि भारतासह अनेक देशांवर परस्पर शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, हे पाऊल अमेरिकेला पुन्हा समृद्ध करेल. इतर देश अमेरिकेपेक्षा खूपच जास्त शुल्क आकारत असून हे खूप अन्यायकारक आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात केलेल्या आपल्या पहिल्या भाषणात भारताच्या आयात शुल्कावर टीका केली. विशेषतः त्यांनी भारताच्या ऑटोमोबाईल आयातीवरील करांवर निशाणा साधला आणि म्हटले की, “भारत आमच्याकडून १०० टक्क्यांपेक्षा जास्त ऑटो कर आकारतो.” पुढे त्यांनी इतरही देशांची नावं घेऊन परस्पर कर २ एप्रिलपासून लागू होईल, असा थेट इशारा दिला आहे. तसेच अमेरिकेला जगातील जवळजवळ प्रत्येक देशाने दशकांपासून फसवले आहे आणि यापुढे असे होऊ देणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
ट्रम्प म्हणाले की, “ट्रम्प प्रशासनाच्या काळात, तुम्हाला एक शुल्क द्यावे लागेल आणि काही प्रकरणांमध्ये ते खूप मोठे शुल्क असेल. इतर देशांनी दशकांपासून आपल्याविरुद्ध शुल्क वापरले आहे आणि आता त्या इतर देशांविरुद्ध त्याचा वापर सुरू करण्याची आपली वेळ आहे. युरोपियन युनियन, चीन, ब्राझील, भारत, मेक्सिको आणि कॅनडा यांच्याबद्दल तुम्ही ऐकले आहे का आणि असंख्य इतर राष्ट्र आपल्यापेक्षा खूपच जास्त शुल्क आकारतात. हे खूप चुकीचे आहे. भारत आपल्याकडून १०० टक्क्यांपेक्षा जास्त वाहन शुल्क आकारतो.”
ट्रम्प यांनी युरोपियन युनियन, चीन, ब्राझील आणि मेक्सिको यांनी लादलेल्या शुल्कांबद्दलही भाष्य केले. तसेच इतर राष्ट्र काय करतात यावर आधारित आता अमेरिका शुल्क लादेल. चीनचा आमच्या उत्पादनांवर सरासरी कर आम्ही त्यांच्याकडून आकारतो त्यापेक्षा दुप्पट आहे. आणि दक्षिण कोरियाचा सरासरी कर चार पट जास्त आहे. त्या चार पट जास्त विचार करा आणि आम्ही दक्षिण कोरियाला लष्करी आणि इतर अनेक मार्गांनी खूप मदत करतो. पण तेच घडते, हे मित्र आणि शत्रू दोघांकडून घडत आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा :
प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ
लष्करी मदत थांबवताच ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास झेलेन्स्की तयार
बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी समाजवादी पक्षाच्या नेत्याला अटक!
‘फिट इंडिया मीट’मधून तळागाळातील खेळाडूंना पारखण्याची संधी!
ट्रम्प यांनी म्हटले आहे की, २ एप्रिलपासून परस्पर टॅरिफ सुरू होईल. याचा अर्थ असा की अमेरिका इतर देशांवरही शुल्क लादण्यास सुरुवात करेल. ते पुढे म्हणाले की, मला हे १ एप्रिलपासून सुरू करायचे होते, पण ‘एप्रिल फूल डे’ सारखे दिसायचे नव्हते. जरी या दिवसाच्या विलंबामुळे आम्हाला खूप पैसे मोजावे लागणार असले तरी, आम्ही ते एप्रिलमध्ये करणार आहोत. मी खूप अंधश्रद्धाळू माणूस आहे.