32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरराजकारणवसई-विरारमधील अनधिकृत बांधकामांविरोधात आगरी सेनेचा एल्गार

वसई-विरारमधील अनधिकृत बांधकामांविरोधात आगरी सेनेचा एल्गार

Google News Follow

Related

वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. या अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारणाऱ्या अधिकाऱ्यांचीच बदली केली गेल्यानंतर पालिकेचेच या अनधिकृत बांधकामांना अभय आहे, असे स्थानिकांना वाटू लागले आहे. त्यातूनच आता या अनधिकृत बांधकामाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. उद्यापासून दोन दिवस सुरू होत असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित केला जाईल, अशी स्थानिक रहिवाशांना अपेक्षा आहे.

आगरी सेनेने यासंदर्भात कठोर भूमिका घेतली असून आगरी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे याला आता वसई विरारमधील राजकीय वातावरण पेट घेणार आहे. जनार्दन पाटील यांनी तर महापालिकेने या अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई केली नाही तर महापालिकेचे कार्यालयच तोडण्याचा इशारा दिला आहे.

हे ही वाचा:
ठाकरे सरकारचा १५५ कोटींचा मीडिया घोटाळा?

डेन्मार्क, इंग्लंडची उपांत्य फेरीत धडक

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात कंत्राटदाराची चांदी?

‘१०० जीव वाचवायचे होते….’ असे लिहीत एमपीएससी विद्यार्थ्याची आत्महत्या

या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणाऱ्या आणि त्यात खोडा घालणाऱ्या पालिकेतील अधिकाऱ्यांची पोलखोल करणारे सहआयुक्त मोहन संखे यांची नुकतीच बदली झाली. त्यांच्यावर झालेल्या एका स्टिंग ऑपरेशनचा व्हीडिओ मध्यंतरी व्हायरल झाला होता. त्यानंतर अनधिकृत बांधकामाचे प्रकरण गाजू लागले. अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील यांच्यावर या प्रकरणात बोट ठेवण्यात आले होते.

जनार्दन पाटील यांचा यासंदर्भात एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ते म्हणतात की, या विभागाच्या विकासासाठी, अनधिकृत बांधकामांना विरोध करण्यासाठी आम्ही शिवसेनेचे उमेदवार इथून उभे राहावेत यासाठी पाठपुरावा केला. पण त्यांच्याकडूनही निराशाच पदरी पडली आहे. इथे शिवसेना निष्क्रीय होती, पण आम्ही या विभागाच्या विकासासाठी त्यांना पाठिंबा दिला. मात्र आज इथे अनधिकृत बांधकामांचे पेव फुटलेले आहे. आता आम्ही आयुक्तांसमोर जाऊन हंगामा करू. त्यांनी ही बांधकामे पाडावीत. आमचे आगरी सेनेचे कार्यालय तोडण्यासाठी हेच पालिकेचे अधिकारी आले होते, पण आता फोफावलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात ते गप्प का आहेत?

वसई विरार नगरपालिकेत अनधिकृत बांधकामाचे पेव फुटण्यामागे पालिकेतील प्रमुख अधिकारी कारणीभूत असल्याचे धक्कादायक वास्तव नुकतेच समोर आले. येथील उमर कंपाऊंडमधील जुनी झाडे तोडून तिथे अनधिकृत बांधकामे भराभर उभी राहात आहेत. त्यात मिळणारा मलिदा अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील यांना मिळत असल्याचा आणि त्यासाठी अभियंता स्वरूप खानोलकर याचाही सहभाग असल्याचा आरोप सहआयुक्त मोहन संखे यांनी केल्याचा धक्कादायक व्हीडिओ व्हायरल झाला होता. हा भ्रष्टाचार व्हीडिओच्या मार्फत उघड केला, काँग्रेस पक्षाचे ह्युमन राइट्स पालघर जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी. त्यांनी यासंदर्भात वारंवार तक्रारीही केल्या, पण त्यांच्या तक्रारींना कुणीही दाद दिली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा